रवि पांडेय, प्रतिनिधी
वाराणसी, 1 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या मुलाचा मृतदेह गंगेच्या वाळूत सापडला. वाराणसी आयुक्तालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्ते हे व्यावसायिक टोळीचे गुन्हेगार नसून स्थानिक जुगारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 2 लाखांच्या कर्जासाठी या नराधमांनी 12 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची हत्या केली.
ही घटना जैतपुरा भागातील लद्दनपुरा येथील असून या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय अनसला पतंग आणण्याच्या नावाखाली अपहरणकर्त्यांनी पळवून नेले आणि गंगेत नेऊन त्याचा गळा दाबून खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनस शनिवारी रात्रीपासून घराबाहेर बेपत्ता होता. कुटुंबीयांच्या माहितीनंतर पोलिसांनी कारवाई तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. या फुटेजमध्ये तीन अपहरणकर्ते अनसला घेऊन जात होते. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून तिघांनाही ताब्यात घेतले. अनसची चौकशी केल्यानंतर त्याचा पत्ता लागला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अपहरणकर्त्यांनी अनसची हत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनसच्या कुटुंबातील एका अल्पवयीन नातेवाईक मुलाचाही अपहरणकर्त्या आरोपींमध्ये समावेश आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त संतोष सिंह यांनी सांगितले की, पतंग उडवण्याच्या बहाण्याने या तिघांनी अनसला रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गंगेच्या पलीकडे नेले आणि बनावट सिमकार्ड घेतले आणि त्याच सिमवरून अनसच्या कुटुंबीयांना फोन केला आणि अनस त्यांच्यासोबत आहे. तो परत हवा असेल तर पैशांची व्यवस्था करा असे सांगितले. यानंतर अनसच्या अपहरणाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. तर दुसरीकडे या कारवाईमुळे अपहरणकर्ते तरुण घाबरले आणि भीतीपोटी निष्पाप अनसचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह वाळूत पुरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.