मुंबई : आधीच सकाळ संध्याकाळ दोन तास पाणी येतं त्यामध्ये पाणी भरायची गडबड त्याच वेळी इतर घरातील सदस्यांची आवरुन कामाला निघण्याची धांदल असते. आता मात्र मुंबईकरांचं टेन्शन वाढणार आहे. याचं कारण म्हणजे मुंबईवर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावू लागला असून सातही धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 12.76 टक्के पाणी शिल्लक आहे. पुढचे केवळ २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असताना राखीव साठय़ाचा वापर करण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पाऊस लांबल्यास मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
पाणीपुरवठा करणाऱ्या उध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांत मिळून केवळ 12.76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उध्र्व वैतरणा धरणातील वापरण्यायोग्य पाणीसाठा शून्यावर आला आहे.
पाणी कधीच शिळं किंवा खराब होत नाही, मग पाण्याच्या बंद बाटलीवर एक्सपायरी डेट का लिहिली जाते?
उपशामुळे अन्य धरणांतील पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाणीसाठय़ातूनच मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे.
मुंबईचा पाणीसाठा १२ टक्क्यांवर; २५ जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक, राखीव साठा वापरण्यास परवानगीची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे.
आंघोळ गरम पाण्याने करावी की थंड? जाणून घ्या तज्ञांचे मत
कोणत्या धरणात किती साठा?
मोडक सागर : २८.८३ टक्के
तानसा : २५.०६ टक्के
मध्य वैतरणा : १०.६७ टक्के
भातसा : ११.१९ टक्के
विहार : २७.९० टक्के
तुळशी : ३२.१८ टक्के
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.