मुंबई : असा क्वचितच कोणी असेल ज्याच्याकडे बाईक किंवा गाडी नाही. लोक दैनंदिन जीवनात प्रवासासाठी आता दुचाकी वापरतात. यामुळे केव्हा ही कुठेही जाता येते शिवाय प्रवास देखील सुखाचा होतो. यामुळे देशात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. पण असे अनेक लोक आहेत, ज्यांना अजूनही बाईक चालवण्याची योग्य पद्धत माहित नाही. तुम्ही देखील अशा पद्धतीने गाडीतर चालवत नाही ना? चला जाणून घेऊ.
दुचाकी थांबवताना आधी ब्रेक दाबावा की क्लच दाबावा? दोघांपैकी काय चांगलं? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. खरंतर याच गोष्टीमुळे अनेक वेळा अपघात देखील घडल्याचे तुम्ही पाहिले असेल. चला याबद्दल सविस्तर माहिती मिळवू.
बाईक थांबवताना आधी ब्रेक दाबायचा की क्लच दाबायचा हे ब्रेकिंगच्या परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणजेच तुम्ही ब्रेक कुठे लावता, ब्रेक का लावता, ब्रेक लावताना बाइकचा वेग किती आहे आणि बाइक कोणत्या गिअरमध्ये आहे. हे समजून घ्यायला हवे.
येथे तुम्हाला 4 परिस्थितींद्वारे समजावून सांगितले जात आहे की, प्रथम काय लागू करावे?
पहिली स्थिथी
जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकले असाल किंवा समोरून एखादा प्राणी आला किंवा समोरचे वाहन थांबले, तर अशा परिस्थितीत दुचाकी पूर्णपणे थांबवावी लागेल. अशा परिस्थितीत जरुरी आहे की तुम्ही आधी क्लच दाबा आणि सोबत ब्रेक दाबा. अशा परिस्थितीत तुमची बाईक तर थांबेल, पण ती बंद होणार नाही. पण तेच जर तुम्ही डायरेक्ट ब्रेक दाबलात तर गाडी जागेवर थांबेल आणि बंद पडले.
दुसरी स्थिती
जर तुमची बाईक वेगात असेल आणि तुम्ही बाइकचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावत असाल, म्हणजेच तुमचा बाइक थांबवण्याचा कोणताही हेतू नाही, पण तुम्हाला गाडी स्लो करायची असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही आधी फक्त ब्रेक वापरू शकता. यानंतर, तुम्ही क्लच लावून गियर डाऊन करू शकता. बाईकचा वेग कमी करण्याची ही चांगली प्रॅक्टिस आहे.
तरुण बाईकवरुन जात असताना, रस्त्याच्या कडेला दिसला सिंह आणि… पुढे जे घडलं ते व्हिडीओत कैद
तिसरी स्थिती
जर तुम्ही ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जात असाल. या दरम्यान, काही कारणास्तव, तुम्हाला तुमचा वेग ताशी 10 ते 15 किलोमीटरने कमी करायचा असेल, तर अशा परिस्थितीत क्लच दाबण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत, हलके ब्रेक लावल्यानंतर, तुम्ही थ्रॉटलचा वापर करून बाइकला त्याच वेगात परत आणू शकता.
चौथी स्थिती
ही आपत्कालीन परिस्थिती असू शकते. जर तुम्ही ट्रॅफिक क्षेत्रात असाल किंवा महामार्गावर असाल किंवा जास्त किंवा कमी वेगाने बाईक चालवत असाल, तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला अचानक बाईक थांबवावी लागली, तर तुम्ही क्लच आणि ब्रेक दोन्ही एकाच वेळी वापरू शकता. अशा परिस्थितीत आपण कोणत्याही प्रकारच्या मायलेजचा विचार करू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.