नवी दिल्ली, 18 मे : लहान मुलं ही खूप खोडकर असतात. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावं लागतं. थोड्यावेळासाठीही त्यांना एकटं सोडलं तरी ते काहीतरी कारनामा करतात आणि नंतर पालकांना तो ठिक करावा लागतो. सोशल मीडियावर असे प्रकार जास्त करुन पहायला मिळतात. त्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कधी कधी लहान मुलांचे मजेशीर व्हिडीओ पहायला मिळतात तर कधी श्वास रोखून ठेवणारे व्हिडीओ व्हायरल होतात. अशाच काहीसा एक व्हिडीओ सध्या समोर आला. जो पाहून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान मूल एका महामकाय अजगराशी खेळताना दिसत आहे. साधारणत: महाकाय अजगर पाहून लोक जीव वाचवून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र हे मूल त्याच्यासोबत खेळताना आणि त्याला त्रास देताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महाकाय अजगर दिसत आहे. त्याच्याशेजारी एक लहान मुलही आहे. ते लहान मुल चक्क या महाकाय अजगरासोबत खेळत आहे. कधी त्याचं त्याच्या मानेला पकडून उचलत आहेत तर कधी त्याच्या पाठीवर बसत आहे. हे सर्व तो चिमुकला न घाबरता करत आहे. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे कोणीतरी व्यक्ती त्याला त्याच्यासोबत खेळून देत त्याचा व्हिडीओ बनवत आहे.
Irresponsible parents. pic.twitter.com/LDJWbYvIS2
— Figen (@TheFigen_) May 16, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.