मुंबई, 2 मे : सोमवारी मुंबईच्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेतून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मात्र ही सभा आणखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली. ती म्हणजे आधी स्टेजवर साधा पोडियम ठेवण्यात आला होता. या पोडियमवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काही नेत्यांची भाषण झाली. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भाषणासाठी उभे राहणार असल्यानं सजावट केलेलं पोडियम व्यासपीठावर आणण्यात आलं. मात्र या पोडियमुळे मागचे नेते दिसत नसल्यानं अजित पवार यांनी हे पोडियम हटवण्यास सांगितलं.
आदित्य ठाकरेंची अजित पवारांशी चर्चा
तुमच्या शहरातून (मुंबई)
अजित पवार यांनी सांगितल्यानंतर हे पोडियम हटवण्यात आलं, मात्र त्यानंतर अजित पवार यांच्याशी आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली अन् काही वेळातच पुन्हा हे पोडियम व्यासपीठावर आणण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह आजित पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या सजवलेल्या पोडियमवरून भाषणं केली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला; …’तर शहागडच्या पुलावरून उडी मारणार’
खुर्चीची चर्चा
दरम्यान या पूर्वी देखील मविआच्या सभेत असाच प्रकार घडला होता. उद्धव ठाकरे यांना वज्रमूठ सभेत बसण्यासाठी वेगळ्या खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती. ही खुर्ची चांगलीच चर्चेत आली. याबाबत मविआच्या नेत्यांना विचारले असता उद्धव ठाकरे आजारी असल्यानं त्यांना वेगळी खुर्ची देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र पहिल्या वज्रमूठ सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुन्हा कधीच वेगळी खुर्ची दिसली नाही. त्यानंतर आता पेडियमुळे ही सभा चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.