अनिरुद्ध जाहगीरदार,प्रतिनिधी
ठाणे , 31 मार्च : शाळा म्हटलं की संस्कार आणि शिस्त आलीच. तेच संस्कार आणि शिस्त देण्याचे काम विद्यार्थ्यांना ठाण्यातील जनरल एज्यूकेशन इंस्टीट्यूटची मोतिलाल हरगोविंददास विद्यालय ही शाळा करत आहेत. ही शाळा 130 हून अधिक वर्षे जूनी असून आजही तितक्याच यशस्वीरित्या समाजाला दिग्गज देण्यास पात्र ठरते आहे. या शाळेने ठाण्यालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच आजवर शेकडो दिग्गज दिले आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे हे सुद्धा या शाळेचे विद्यार्थी होते.
कधी झाली शाळेची स्थापना?
तुमच्या शहरातून (मुंबई)
मोतिलाल हरगोविंददास विद्यालयची स्थापना ही 1892 साली झाली. त्या वेळेस गोपाळ नारायण अक्षीकर हे जनरल एज्यूकेशन इंस्टीट्यूटचे संस्थापक होते आणि केशवराव ताम्हणे हे मोतिलाल हरगोविंददास विद्यालयाचे एक संस्थापक आणि पहिले मुख्याध्यापक होते. मोतिलाल हरगोविंददास ठाणावाला यांच्या नावाने हे विद्यालय ओळखले जाते. जनरल एज्यूकेशन इंस्टीट्यूटची छबिलदास विद्यालय ही पहिली शाळा दादर येथे उघडण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबईत विविध जागांवर या इंस्टीट्यूटने विविध शाळा सुरू केल्यात ज्यापैकी मोतिलाल हरगोविंददास विद्यालय हे एक आहे.
कला क्षेत्राचा इतिहास
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन सुरू होण्यापूर्वी या शाळेत खुला मंच होता. जेथे विविध नाटकांचे सादरीकरण व्हायची. त्यामुळे या शाळेला नाट्य व कला क्षेत्राचा इतिहास लाभला आहे आणि यामुळे या शाळेत नाट्य, कला या विषयांना वाव दिल्या जातो. या शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त प्रात्यक्षिक अभ्यासावर सुद्धा भर दिला जातो. त्याकरिता शाळेत इलेक्ट्रॉनिक लॅब, कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय या सुविधाही विद्यार्थ्यांना पुरविल्या जातात. या शाळेत स्वास्थ्याला आणि क्रिडा क्षेत्राला सुद्धा वाव दिल्या जातो. ज्याचे उदाहरण म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे.
विद्यार्थी समाजाला देण्यास पात्र
ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे, सध्या सर्वोच्च न्यायालयाचे असलेले न्यायमूर्ती अभय ओक, चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री संपदा जोगळेकर, अभिनय क्षेत्रातले विघ्नेश जोशी तसेच संगीत कलाकार मुकुंदराज देव, ठाण्यातील नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ नितीन बुरकुले, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आनंद घईसास, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च बहुमान प्राप्त झालेले विजय जोशी, लोकसभा सदस्य राजन विचारे व असे असंख्य आपापल्या क्षेत्रातील यशस्वी आणि दिग्गज असे विद्यार्थी हरगोविंददास विद्यालय समाजाला देण्यास पात्र ठरली आहे, अशी माहिती मुख्याधिपका निलांबरी जठार यांनी दिली आहे.
Mumbai News : आकडेमोड झाली सोपी, विद्यार्थ्यांना कलेतून गणिताचे धडे, पाहा Video
सातत्याने उत्तम शिकवणी
शाळेत दरवर्षी एप्रिल महिन्यात छंद वर्गाचे आयोजन केले जाते. ज्यात विद्यार्थ्यांना विविध गोष्टी शिकवील्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्व विकासावर छंद वर्गात भर दिला जातो. शाळेला आजवर विविध स्पर्धांमध्ये त्याचसोबत अनेक संघटनांद्वारा शेकडो पुरस्कार प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे मोतिलाल हरगोविंददास विद्यालय हे विद्यार्थ्यांना सातत्याने उत्तम शिकवणी देवून समाजाला उत्तम आणि दिग्गज असे विद्यार्थी देऊ करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.