अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 8 मे : आपली मावस बहीण पोहायला जात असल्याचे पाहून एक नऊ वर्षीय चिमुकलीने पोहायला जाण्याचा हट्ट धरला. पण तिला पोहता येत नसल्याने तिचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर शहरात उघडकीस आली. विशेष म्हणजे ही चिमुकली आपल्या मावशीकडे सुट्ट्यांमध्ये आली होती. ती आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पालकांनो सावधान..
तुमच्या शहरातून (छ. संभाजीनगर)
आपल्या पाल्यांना कुठल्याही कॅम्पमध्ये पाठवायच्या आधी त्या प्रशिक्षकाकडे दहा ते पंधरा विद्यार्थी असावेत याची खात्री आपल्या पालकांनी करून घ्यावी. काही वेळा पोहताना डोक्याला मार लागून देखील अपघात होतात तर त्याचीही स्विमिंग करणाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे जलतरण प्रशिक्षकांनी सांगितले आहे. अनेक पालक दुसऱ्यांच्या मुलाचं बघून आपल्या मुलांना देखील विविध कॅम्पमध्ये पाठवतात. मग त्यामध्ये स्विमिंग असेल ट्रेकिंग असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटीज असतील तर पालकांनी तसे न करता आपल्या मुलाला कशाची आवड आहे हे बघूनच त्या मुलाला संबंधित कॅम्पमध्ये पाठवावे.
वाचा – सात वर्ष चाललं अफेअर, पण प्रेमात मिळाला धोका, मग तरुणानं जिद्दीनं करून दाखवलं ते काम
ज्या खेळाचे आपल्या मुलांना ज्ञान आहे. तशाच खेळाच्या कॅम्पमध्ये आपल्या मुलांना पाठवावेत तसेच प्रशिक्षकाकडे पाठवाना ते प्रशिक्षक चांगले आहेत का? याची खात्री करूनच प्रशिक्षकाकडे मुलांना पाठवावे. तसेच बहुतांश पालक सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांसह अनेक धोकादायक स्थळी पर्यटनाला जातात. त्या ठिकाणी देखील पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
छत्रपती संभाजी नगर शहरातील घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्व पालकांनी आपल्या लहान मुलांची उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये समर कॅम्पमध्ये पाठवताना, तसेच विविध पर्यटनस्थळी जाताना आपल्या लहान मुलांची योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. नाहीतर दुर्दैवाने अशी दुर्घटना आपल्याही मुलासोबत घडू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.