अबुजा, 09 एप्रिल : आफ्रिकन देशांमध्ये सध्या मृत्यूचं तांडव सुरू आहे. तीन वेगवेगळ्या देशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. यात अनेक लोकांची हत्या झालीय. उत्तर मध्य नायजेरियात एका शिबिरात झालेल्या हल्ल्यात किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदुक घेऊन आलेल्यांनी शुक्रवारी सायंकाळी शाम बेन्यू राज्यातील मगबान गावात नागरिकांवर हल्ला केला. आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
अधिकाऱ्यांनी म्हटलं की, अद्याप हे स्पष्ट नाही की या हल्ल्यासाठी कोण जबाबदार आहे. मात्र संशय स्थानिक मेंढपाळांवर आहे. उत्तर मध्य नायजेरियातील जमिनीवरून शेतकऱ्यांसोबत त्यांचा जुना वाद आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी राज्यातील उमोगिडी गावात उमोगिडी गावात बंदुकधाऱ्यांनी दोन वेगवेगळे हल्ले केले, त्यात किमान ५० जणांचा मृत्यू झाला.
आता घाबरण्याची गरज नाही! शास्त्रज्ञांना मोठं यश, कोरोना कायमचा ‘आऊट’ होणार?
उत्तर बुर्किना फासोमध्येही मुस्लिम कट्टरपंथियांनी अनेक हल्ले केले असून यात किमान ४४ जणांची हत्या झाली आहे. सरकारने शनिवारी याबाबत माहिती दिली. साहेलचे गव्हर्नर लेफ्टनंट कर्नल पीएफ रोडोल्फे सोरगो यांनी म्हटलं की, जिहादींनी सेनो प्रांतात कूराकू आणि तोंदोबी गावांवर हल्ला केला. सोरगो यांनी गुरुवार, शुक्रवारी झालेल्या हल्ल्यांना घृणास्पद आणि विध्वंसक म्हटलं आहे. सरकार परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
पूर्व कांगोतही कट्टरपंथीय विद्रोहींनी हल्ला केला असून यात किमान २२ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. आठवड्यातील हा दुसरा मोठा प्राणघातक हल्ला आहे. ओइचाचे महापौर निकोलस कम्बाले यांनी सांगितलं की, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असलेल्या एडीएफने शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर किवु प्रांतातील बेनी क्षेत्रात हल्ला केला.
कम्बाले यांनी सांगितलं की, शत्रूने निर्दयीपणे लोकांची हत्या केली. या हल्ल्यात किमान २२ जण मृत्यूमुखी पडले. काही दिवसांपूर्वी एडीएफने इटुरीतील इरुमु आणि मांबासातील महिला आणि मुलांसह ३०हून अधिक नागरिकांची हत्या केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.