मुंबई, 10 मे : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, निकालाआधी सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून कायदा व्यवस्था स्वतंत्र्य असेल तर न्याय मिळेल, असं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
तुमच्या शहरातून (मुंबई)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी यावर प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, या देशात लोकशाही आहे की नाही, याचा फैसला उद्या होईल. विधानसभा आणि संसद या संविधानानुसार चालले की नाही हेही समजेल. न्यायव्यवस्था कुणाच्या दबावाखाली काम करतंय का? याचाही फैसला उद्या होईल. सरकारे पाडली जात आहेत, न्यायालये विकली जात आहेत का? याचाही उद्या फैसला होईल, असे म्हणत उद्या आम्हाला न्याय मिळेल असा दावा संजय राऊत यांनी केला.
वाचा – कोर्टाच्या निकालाआधी शिंदे राजीनामा देतील का? फडणवीस स्पष्टच बोलले
जर कुणी म्हणत असेल आमच्याच बाजूने निर्णय येणार, तर याचा अर्थ त्यांनी काय तरी केलं आहे. उद्या काय ते सर्वोच्च न्यायालय ठरवेल. विधानसभा अध्यक्ष विसरले आहेत की त्याच्ंयाप्रमाणे जाण असलेली व्यक्ती त्या खुर्चीवर बसलेली होती, त्यांनीही एक निर्णय दिला होता. तरीही सरकार बनले. मला अजिबात कायद्याचे ज्ञान नाही. पण ते कायदे पंडित आहेत. हे स्वतःला कायदे पंडित म्हणत असतील तर मला कायद्याची चिंता वाटते. आम्ही उद्याच्या निर्णयाची वाट बघत आहोत. आम्हाला खात्री वाटतेय आम्हाला न्याय मिळेल.
उद्या एक वाजता नितीश कुमार मातोश्रीवर येत आहेत. उद्या ते उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यानंतर आणखी काही वरिष्ठ नेत्यांना भेटतील. कुणाला भेटतील ते त्यांचे पक्ष सांगतील. नाहीतर ते म्हणतील की आमची वकिली करू नका म्हणून असा टोलाही यावेळी राऊत यांनी अजित पवार यांना यावेळी लगावला. याआधी मलिकार्जुन खर्गे यांनी पुढाकार घेतला होता, आता उद्या नितीश कुमार घेत आहेत. सत्ता परिवर्तन उत्तरेकडील राज्याकडून होते. राष्ट्र म्हणून आम्ही एक आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.