मुंबई, 09 एप्रिल : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात चेन्नईने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्जने हायव्होल्टेज सामन्यात मुंबईला ७ गडी राखून धूळ चारली. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमधला हा दुसरा पराभव ठरला. सामन्यात पराभवानंतर बोलताना रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स सलग ८ सामने गमावल्यानंतर पहिला सामना जिंकली होती. त्यामुळे चेन्नईविरुद्ध पराभवानंतर त्याला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा रोहित शर्मा नाराज झाल्याचं दिसलं. रोहित शर्मा म्हणाला की, आम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षीची कामगिरी निराशाजनक होती, पण आम्ही नव्याने सुरुवात करतो. आम्ही पाच ट्रॉफी जिंकल्या, तेव्हा आम्ही कधीच विचार केला नाही की गेल्या वर्षी आम्ही जिंकलो आहे.
स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो
मुंबई इंडियन्सच्या स्टार फलंदाजांची कामगिरी सध्या त्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे. रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाही. सूर्यकुमार यादवची बॅटही तळपली नाहीय. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात फक्त १५८ धावाच करता आल्या. चेन्नईने हे आव्हान तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यंदाच्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय आहे.
IPL 2023 : MI विरुद्ध वानखेडेवर फटकेबाजीनंतर रहाणेने व्यक्त केली एकच इच्छा
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत एका पाठोपाठ एक मुंबईच्या फलंदाजांना तंबूत धाडले. मुंबईला २० षटकात ८ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईकडून इशान किशनने ३२, टीम डेविडने ३१ आणि रोहित शर्मा यांनी २१ धावा केल्या. चेन्नईकडून जडेजाने ३ तर तुषार देशपांडे आणि मिशेल सँटनरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मुंबईने दिलेलं १५८ धावांचं आव्हान चेन्नईने १८.१ षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.अजिंक्य रहाणेच्या वादळी अर्धशतकाच्या आणि ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे यांच्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने १२ चेंडू आणि ७ गडी राखून विजय मिळवला. मुंबईला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवून चेन्नई जिंकली. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा सलग दुसरा पराभव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.