मुंबई, 29 मार्च : आयपीएल 2023 ला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन यांच्यात रंगणार आहे. परंतु यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून एक वाईट बातमी समोर येत आहे. चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला सरावा दरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयपीएलपूर्वी चेन्नईच्या संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2023 साठी महेंद्र सिंह धोनी मागील अनेक महिन्यांपासून होम ग्राउंडवर सराव करीत आहे. सरावा दरम्यान धोनीचे अनेक फोटो आणि व्हिडिओस समोर आले असून यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा धोनीला क्रिकेटच्या मैदानावर प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. असे असतानाच धोनीला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
सध्या धोनीचा सरावा दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला असून यात धोनी डाव्या पायाने लंगडत असताना दिसत आहे. त्यामुळे धोनीला पळताना देखील अडचण येत होती. अद्याप धोनीच्या दुखापतीबाबत चेन्नई संघाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी ऐन आयपीएलच्या तोंडावर चेन्नई संघासाठी ही चिंतेचीबाब असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.