निखिल स्वामी (बिकानेर), 04 मे : आपल्या जवळच्या आणि प्रियजनांच्या सुखासाठी आणि सोयीसाठी माणूस आयुष्यभर धावत राहतो. पण आजूबाजूच्या जगात वंचित आणि गरजूंच्या वेदना फार कमी लोकांना समजत असतात. यासाठी तुमच्याकडे किती पैसा आणि संसाधने आहेत हे महत्त्वाचे नाही, तर तुमचे हृदय किती मोठे आहे हे महत्त्वाचे आहे. असेच एक अनोखे उदाहरण बिकानेर येथील सरकारी कन्या उच्च माध्यमिक विद्यालयात चतुर्थ श्रेणी सहाय्यक कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या विमला देवी मारू हिने सर्वांसमोर मांडले आहे.
आयुष्यात पती आणि मुलगा गमावलेल्या विमला देवी यांनी भविष्याची पर्वा न करता स्वत:च्या शाळेत लाखो रुपयांच्या रूम बनवून दिल्या आहेत. विमला देवी मारू यांनी आयुष्यभर आपलं जीवन संघर्ष केले आहे.
Nashik News : ‘दोस्तो की दुनियादारी’ तब्बल 36 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले शाळेतले मित्र
पती आणि एका मुलाच्या मृत्यूनंतर तीला मोठा धक्का बसला. पण तीला जगायचं असल्याने ती थांबली नाही काही काळानंतर पुन्हा शाळेत जाऊ लागल्या. कन्या शाळेत मागच्या कित्येक वर्षांपासून विमला देवी रोज झाडू मारतात.
आज त्याच शाळेत त्यांनी स्वतःच्या पैशातून लाखो रुपये किमतीच्या दोन खोल्या बांधल्या आहेत. या दोन्ही खोल्यांची किंमत सुमारे 6.50 लाख रुपये आहे. या शाळेत 25 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून 600 मुली शिकतात.
कोल्हापूरच्या प्रतिकचा नादखुळा, मुलींना सुद्धा लाजवेल केलं असं काम, आता देशभरातून डिमांड
विमला देवी पुढे म्हणाल्या की, माझे लग्न मी लहान असतानाच झाले परंतु लग्नानंतर पाच वर्षांनी पतीचा मृत्यू झाला. यानंतर मी आणि माझा मुलगा एकत्र राहत होतो. पण त्यानंतर वयाच्या 25 व्या वर्षी मुलाचाही अपघाती मृत्यू झाला. यानंतर तिने ठरवलं की आपल्याला शाळेसाठी जगायचं यातून तिने वेळोवेळी शाळेला गरजेनुसार पैसे दिले. याशिवाय तिने शाळेत वॉटर कुलर बसवले असल्याचे तिने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.