मुंबई, 5 एप्रिल : जगप्रसिद्ध टी 20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज आयपीएल 2023 चा आठवा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु असून या सामन्यात आर अश्विन राजस्थानचा संघाकडून ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात उतरला. विजयासाठी मोठे आव्हान असताना आर अश्विनला ओपनिंगसाठी आलेलं पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले .
आसाम क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडीयमवर पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरु आहे. यात पंजाब किंग्सचा संघ प्रथम बॅटिंगसाठी मैदानात उतरला. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन जबरदस्त बॅटिंग केली. शिखर धवनने 56 चेंडूंमध्ये संघासाठी 83 धावांची नाबाद खेळी. तर प्रभसिमरन सिंहने 34 चेंडूत 60 धावा करून संघाला मोठी लीड मिळवून दिली. पंजाब किंग्सने राजस्थान विरुद्ध बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स देऊन 197 धावा केल्या. तर राजस्थानकडून जेसन होल्डरने 1 विकेट तर आर अश्विन आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
विजयासाठी राजस्थान समोर 198 धावांचे आव्हान असताना, राजस्थानकडून मजबूत सुरुवात होणे अपेक्षित होते. परंतु ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात स्टार गोलंदाज अश्विनची एंट्री झाली. अश्विनला ओपनिंगला आलेले पाहून सप्रेक्षक अवाक झाले. आर अश्विन आयपीएलच्या दहा वर्षातील इनिंगमध्ये प्रथमच ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरला होता. जॉस बटलरला फिल्डिंग करताना दुखापत झाल्यामुळे आर अस्विन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु ओपनिंग बॅट्समन म्हणून आलेला अश्विन संघासाठी चांगली कामगिरी करू शकला नाही. तो 4 चेंडूंवर 0 धावा करून बाद झाला. स्टार युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने त्याची विकेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.