निखिल स्वामी (बिकानेर), 05 मे : मनात जोश आणि होश असेल तर कोणतीही समस्या मोठी नसते. असेच एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं आहे. आतापर्यंत या शाळेतील 80 हून अधिक मुले शासकीय सेवेत चांगल्या पदावर बसून शाळेचं नावलौकिक मिळवत आहेत. ही शाळा आहे राजस्थानमधील बिकानेरची, बिकानेरची हे एकमेव शासकीय अंध वसतिगृह उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेत सर्व मुले आंधळी आहेत म्हणजेच डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. या शाळेत दरवर्षी एक ना एक बालक शासकीय सेवेत जातोच.
शाळेचे मुख्याध्यापक अल्ताफ अहमद आणि ज्येष्ठ शिक्षक नवाब यांनी सांगितले की, येथून शिकणारी मुले केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सरकारी नोकरी करत आहेत. ही शाळा 1966 मध्ये सुरू झाली. सध्या या शाळेत 92 मुले शिकत असून ती सर्व अंध आहेत. या सर्व मुलांचे स्वप्न आयएएस असल्याचे त्यानी सांगितलं.
जोश जीवावर बेतला, 300 च्या स्पीडवर अपघात, हेल्मेट फुटलं; बाईकचा चुराडा, युट्यबर जागेवर गेला
राधेश्याम पुढे म्हणाले की, येथून 1977 मध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर 1982 मध्ये सरकारी नोकरीला सुरुवात केली. आता मी 2018 पासून या शाळेत लेक्चरर म्हणून काम करत आहे.
दृष्टीहीन मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले वातावरण दिले तर ते शिक्षणात व इतर क्षेत्रात मोलाचे योगदान देऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. आज आपण कोणावरही अवलंबून नसून समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत.
सभा न घेताच प्रणिती शिंदे यांना माघारी परतावं लागलं; कर्नाटकात नेमकं काय घडलं?
या शाळेतून उत्तीर्ण होऊन विद्यार्थी आज चांगल्या पदावर विराजमान आहेत. यामध्ये बँक मॅनेजर, आर्मी, प्राचार्य, लेक्चरर, शिक्षक, रेल्वे, कनिष्ठ लिपिक अशा अनेक विभागात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.