धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 3 मे : इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिच्या निधनानंतर येत्या 6 मे रोजी राजपुत्र किंग चार्ल्स हे इंग्लंडचे नवे राजे म्हणून त्यांचा राज्याभिषेक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या राज्याभिषेक सोहळ्याचे निमंत्रण मुंबईच्या डबेवाल्यांनादेखील ब्रिटिश दुतावासाकडून पाठवण्यात आले आहे.
पुणेरी पगडी भेट
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुंबईचे डबेवाले आणि किंग चार्ल्स यांचं पूर्वपार मैत्री संबंध आहेत. त्यामुळे मुंबईत ब्रिटनच्या उच्चायुक्तांतर्फे मंगळवारी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला किंग चार्ल्स यांचे जवळचे मित्र मानले जाणाऱ्या मुंबईतल्या डबेवाल्यांचे प्रतिनिधी ही उपस्थित होते. या सोहळ्यात किंग चार्ल्स यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी डबेवाल्यांनी पुणेरी पगडी आणि शाल भेट म्हणून पाठवली आहे.
तसेच डबेवाल्यांची ओळख असलेली गांधी टोपी देखील त्यांना भेट देण्यात आली आहे. मुंबईतील ताजमहल हॉटेलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुंबईतील अनेक उद्योजक महाराष्ट्र सर्कल सरकारमधील अधिकारी कॉमनवेल्थ देशाचे कौन्सिल जनरल उपस्थित होते.
समारंभाचे निमंत्रण
राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तिसरे हे इंग्लंडचे राजे बनत आहेत. 6 तारखेला त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. आपण पाहिलं असेल 2004 पासून किंग चार्ल्स व डबेवाल्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 2004 साली झालेल्या भेटीनंतरच डबेवाल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. हेच मैत्रीपूर्ण संबंध आज देखील कायम आहेत. ही मैत्री लक्षात घेता भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त यांनी हॉटेल ताज येथे राज्याभिषेक सोहळ्याच्या समारंभाचे निमंत्रण आम्हाला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि किंग चार्ल्स यांना पुणेरी पगडी व शाल भेट दिली, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे खजिनदार सुनील शिंदे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.