मुंबई, 30 मार्च : आयपीएल 2023 ला उद्या 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील पाहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गतविजेता गुजरात जाएंट्स यांच्यात रंगणार रंगणार आहे. यंदा आयपीएलमध्ये 10 संघ विजेतेपदाची ट्रॉफी पटकावण्याची मैदानावर भिडणार असून कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु आयपीएल सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने IPL 2023 च्या विजेत्या संघाचं नाव सांगितलं आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आयपीएल चा पहिला सामना पारपडणार असून यापूर्वी आयपीएलचा दिमाखदार ओपनिंग सोहोळा पारपडेल. यंदा आयपीएलमध्ये 52 दिवसात जवळपास 70 सामने खेळवले जाणार असून फायनल सामना 1 जून रोजी होईल. परंतु आयपीएलला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याच्या एका ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी एक ट्विट करत आयपीएल2023 च्या विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावणार याविषयी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले, “IPL सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.. क्रिकबझचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. मला वाटते की हे वर्ष राजस्थान रॉयल्सचे आहे. ते मे महिन्याच्या शेवटी ट्रॉफी उंचावतील.
Can’t wait for the IPL to start .. Looking forward to being part of the @cricbuzz team .. I thinks it’s going to be @rajasthanroyals year .. they will be lifting the trophy in late May .. #OnOn #IPL2023
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 29, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.