धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 5 मे : इंग्लडचे प्रिन्स किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाचं काऊंटडाऊन सुरू झालंय. राणी एलिजाबेथ यांचं मागच्या वर्षी निधन झालं होतं. त्यानंतर शनिवारी (6 मे) रोजी चार्ल्स यांचा इंग्लंडचा नवा राजा म्हणून राज्याभिषेक होईल. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मुंबईचे डबेवाले पाठवणार भेट
तुमच्या शहरातून (मुंबई)
ब्रिटन राजघराण्याच्या प्रत्येक सुख:दुखात मुंबईचा डबेवाला सहभागी झाला आहे. त्यांनी यापूर्वी चार्ल्स यांच्या मुलाच्या लग्नात आहेर पाठवला होता. त्याचबरोबर प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले तेव्हा त्याचे नातवाला गंठन, वाळे, काकंण, कंमर साखळी असे दागिणे पाठवले. राणी एलिजाबेथ यांचे निधन झाले तेव्हा ही डबेवाल्यांनी शोक व्यक्त केला होता.
प्रिन्स चार्ल्स राजा होत असल्याबद्दल डबेवाल्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी डोक्यावर 2.23 किलो सान्याचा मुकुट घातला जाणार आहे. त्याचवेळी डबेवाल्यांनी देखील पंचधातूंचा सोनेरी मुकूट भेट म्हणून पाठवला आहे. हा मुकूट डबेवाल्यांच्या कामावर पीएचडी करणाऱ्या डॉ. पवन अग्रवाल यांनी दिलाय.
इंग्लंडचा राजा घालणार पुणेरी पगडी, मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठवली खास भेट
‘राज्याभिषेकाच्या कार्यक्रमात राजमुकूट हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मुंबई डबेवाला असोसिएशनकडून चार्ल्स यांना हा राजमुकूट भेट म्हणून देण्यात आलाय. 6 मे रोजी किंग चार्ल्स यांचा लंडनमध्ये राज्याभिषेत होतोय. त्यापूर्वी मुंबईतील ब्रिटीश दुतावासात हा राजमुकूट सुपूर्त करण्यात आलाय, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
चार्ल्स घालणार पुणेरी पगडी
मुंबईच्या डबेवाल्यांनी यापूर्वी चार्ल्स यांना पुणेरी पगडी आणि शाल भेट म्हणून पाठवली आहे. मुंबईत ब्रिटनच्या उच्चायुक्तांतर्फे मंगळवारी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला डबेवाल्यांचे प्रतिनिधी ही उपस्थित होते. त्यावेळी डबेवाल्यांनी ही भेट दिली. त्याचवेळी डबेवाल्यांची ओळख असलेली गांधी टोपी देखील त्यांना भेट देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.