मुंबई, 04 मे: इंजिनीअरिंगमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बाातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इंजिनीअरची एकूण 428 पदं भरली जाणार आहेत. ट्रेनी इंजिनीअरच्या 101 आणि प्रोजेक्ट इंजिनीअरच्या 327 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ट्रेनी किंवा प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार बीईएलच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. 18 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ‘स्टडी कॅफे डॉट इन’ने याबाबत वृत्त दिलंय.
बीईएलच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना महिन्याला 55000 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. प्रोजेक्ट इंजिनीअरसाठी वयोमर्यादा 32 वर्षे आणि ट्रेनी इंजिनीअरसाठी 28 वर्षे असेल. भरतीसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज पात्रतेच्या आधारावर निवडले जातील, व निवडलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवले जाईल. भरतीसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे माहिती दिली जाईल. प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी 400 रुपये आणि ट्रेनी इंजिनीअर पदासाठी अर्ज फी 150 रुपये असेल. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट इंजिनीअर : या पदासाठी मान्यप्राप्त विद्यापीठ, संस्था किंवा महाविद्यालयातून बी.ई, बी.टेक, बी.एस्सी (4 वर्षांचा अभ्यासक्रम) पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतील. खुला, ईडब्ल्यूएस, ओबीसी उमेदवारांसाठी पदवीला 55% आणि त्याहून अधिक गुण आवश्यक आहे. तर, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवार पदवी ‘पास क्लास’मध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
केंद्र सरकारच्या मिनीरत्न कंपनीत नोकरीची सर्वात मोठी संधी; तुम्ही आहात का पात्र? लगेच करा अप्लाय
ट्रेनी इंजिनीअर : या पदासाठी मान्यप्राप्त विद्यापीठ, संस्था किंवा महाविद्यालयातून बी.ई, बी.टेक, बी.एस्सी (4 वर्षांचा अभ्यासक्रम) पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतील. खुला, ईडब्ल्यूएस, ओबीसी उमेदवारांसाठी पदवीला 55% आणि त्याहून अधिक गुण आवश्यक आहे. तर, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवार पदवी ‘पास क्लास’मध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
अशी केली जाईल भरती
भरतीसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज पात्रतेच्या आधारावर निवडले जातील, व निवडलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावलं जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जाईल. त्यानंतर उमेदवारांना 1:5 च्या गुणोत्तरानुसार लेखी परीक्षेतील गुणांवर इंटरव्ह्यूसाठी निवडलं जाईल.
वयोमर्यादा
प्रोजेक्ट इंजिनीअर – कमाल 32 वर्षे
ट्रेनी इंजिनीअर – कमाल 28 वर्षे
फ्रेशर्स उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! ‘ही’ मोठी IT कंपनी येत्या वर्षी 15,000 जणांना देणार नोकरी
किती मिळेल महिन्याला वेतन?
या भरती प्रक्रियेद्वारे प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून निवड झालेल्या उमेदवाराला महिन्याला 55000 रुपये वेतन मिळेल. तर, ट्रेनी इंजिनीअर म्हणून निवड झालेल्या उमेदवाराला महिन्याला 40000 रुपये वेतन मिळेल.
रिक्त जागा
प्रोजेक्ट इंजिनीअर – 327
ट्रेनी इंजिनीअर – 101
दरम्यान, बीईएल कंपनीतील भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवार कंपनीची अधिकृत वेबसाइटhttps://www.bel-india.in/वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. या वेबसाइटवर भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.