कराची 30 एप्रिल : जगातील अनेक देशांमध्ये महिलांवरील अत्याचार अजूनही थांबत नाहीत. दरम्यान, मानवतेला लाजवेल अशी बातमी समोर आली आहे. घटना पाकिस्तानची आहे. इथे महिला मृत्यूनंतरही सुरक्षित नाहीत. त्यांच्या मृतदेहांसोबत गैरवर्तन केलं जात आहे, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही कबरीला कुलूप लावावं लागत आहे.
पाकिस्तानमध्ये आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर पालकांना त्यांच्या कबरींना कुलूप लावावं लागत आहे. इथे पुन्हा एकदा मृत महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. यामध्ये कार्यकर्ते आणि लेखक हॅरिस सुलतान यांचा समावेश आहे. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत या प्रकरणाची माहिती दिली.
त्यांनी ‘द कर्स ऑफ गॉड, व्हाय आय लेफ्ट इस्लाम’ नावाचे पुस्तक लिहिलं आहे. हॅरिसने इस्लाम का सोडला हे सांगितलं आहे. आता त्यांनी या घृणास्पद घटनेसाठी कट्टर इस्लामिक विचारसरणीला जबाबदार धरलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘पाकिस्तानने इतका लबाड, लैंगिकदृष्ट्या निराश समाज निर्माण केला आहे की लोक आता त्यांच्या मुलींच्या कबरींना कुलूप लावत आहेत. जेणेकरून त्यांच्यावर बलात्कार होऊ नये. जेव्हा तुम्ही बुरख्याचा संबंध बलात्काराशी जोडता तेव्हा तो तुमच्या थडग्यापर्यंत तुमच्या मागे येतो’.
रिपोर्ट्सनुसार, अशाच प्रकारचे ट्विट इतर अनेक यूजर्सनी देखील केले आहेत. 2011 मध्ये पाकिस्तानात अशीच एक घृणास्पद घटना घडली होती. त्यानंतर कराचीच्या नाझिमाबाद येथील कबरची काळजी घेणाऱ्या मुहम्मद रिझवान नावाच्या युजरने कबुली दिली, की त्याने 48 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला होता.
त्याला ताब्यात घेण्यात आलं. दुसरीकडे मे 2022 मध्ये, काही अज्ञात व्यक्तींनी एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि तिच्यावर बलात्कार केला. पाकिस्तानातील गुजरातमधील कामाला गावातून हे प्रकरण समोर आलं होतं. ज्या दिवशी या मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला, त्याच दिवशी संध्याकाळी तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार घडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.