नवी दिल्ली, 20 मे : सामान्यपणे रुग्णालयात आपण उपचारासाठी, आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी जातो. एखाद्या रुग्णालयात नीट उपचार दिले जात नसतील, जास्त मृत्यू होतात, अशी काही प्रकरणं आली तर आपण त्या रुग्णालयात जाणं टाळतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक असं ठिकाण जिथं रुग्णांना औषध नव्हे तर चक्क विष दिलं जातं. या विचित्र उपचारात कित्येकांचा मृत्यूही होतो. पण तरी लोक इथं उपचारासाठी येतात.
विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. जवळपास प्रत्येक आजारावर औषध आहे. पण आजही जगात अशा अनेक पारंपरिक पद्धती आहेत, ज्यावर लोक अवलंबून आहेत. कॉम्बो त्यापैकी एक आहे. वास्तविक कॉम्बो हे मुळात विष आहे. म्हणून काही देशांमध्ये त्यावर बंदी आहे. परंतु अमेरिकेत ते कायदेशीररित्या वैध आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासनानं ते अद्याप नियमित केलेलं नाही. ते कितपत प्रभावी आहे यावर कोणतंही संशोधन केलं गेलं नाही, परंतु हजारो लोक अजूनही या पद्धतीद्वारे उपचार घेत आहेत. यामध्ये अनेक श्रीमंतांचाही समावेश आहे.
हे इतकं धोकादायक आहे की ऑस्ट्रेलियात नुकत्याच दोन जणांचा मृत्यू झाला. नताशा लेचनर नावाच्या महिलेला खूप दिवसांपासून पाठदुखी होती. औषधांनी बरे होऊ शकली नाही. कोणीतरी तिला या पद्धतीने उपचार करण्याचा सल्ला दिला. तिला घरी बोलावून उपचार केले, मात्र कॉम्बो लावल्यानंतर काही सेकंदातच ती बेशुद्ध झाली आणि काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. तसेच 46 वर्षीय जराड अँटोनोविच हे उपचारानंतर आजारी पडले. त्याचा चेहरा सुजला आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.
मॅजिकल राइस! असा भात जो खाल्ल्यावर तुमचं फॅट बिलकुल वाढणार नाही
यामध्ये बेडकाचं विष रुग्णांना दिलं जातं. सुरुवातीला, रुग्णाला एक लिटर पाणी किंवा कसावा सूप दिलं जातं. काही काळानंतर, ज्वलंत रॉडसह खांद्याजवळ एक छिद्र केलं जातं. रॉड लावताच एक फोड येतो आणि तिथे बसलेला माणूस त्यावर ओरखडा करतो. त्यानंतर त्या जखमेत बेडकाचे विष भरलं जातं. विषयुक्त मांसाच्या संपर्कात येताच माणूस वेड्यासारखा होतो. कारण ते रक्त त्याच्या संपूर्ण शरीरात जातं. उलट्या-जुलाब सुरू होतात. वारंवार लघवी स्त्राव, चक्कर येणं, उच्च रक्तदाब आणि तीव्र ओटीपोटात दुखणं. हे फक्त 5 ते 30 मिनिटांसाठी होत असलं तरी अनेक वेळा लोक तासन्तास अस्वस्थ राहतात.
मग शरीरातून विष बाहेर काढण्यासाठी पाणी किंवा चहा दिला जातो. शरीर थंड ठेवण्यासाठी लोकांना जवळच्या नदीत तासनतास झोपण्यास सांगितलं जातं. असं असूनही लोक हतबल राहतात. कधी कधी ते बेशुद्धही होतात.
तरुणाच्या घशात अडकला चांदीचा दात, घडलं असं की…
अॅमेझॉनच्या देशांमध्ये निसर्गोपचार म्हणून ओळखल्या जाणार्या या पद्धतीमुळे अनेक आजार बरे होतात असे मानले जाते. कॅन्सर, वंध्यत्व, नैराश्य आणि अल्झायमर यांसारखे आजार ताबडतोब बरे होतात असा दावाही केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.