इस्लामाबाद, 9 मे : पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरून अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये पाकिस्तानी रेंजर्स इम्रान खान यांना खेचत घेऊन जात असल्याचं दिसत आहे.
इम्रान खान यांना अशाप्रकारे अटक म्हणजे त्यांचं अपहरण असल्याचा आरोप इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने केला आहे. पीटीआयने याबाबतचं ट्वीट केलं आहे. इम्रान खान यांना अटक करताना पाकिस्तानी रेंजर्सकडून धक्काबुक्की करण्यात आली, ज्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचा आरोपही पीटीआयने केला आहे.
इम्रान खान यांच्या अटकेवेळी हायकोर्टाच्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहितीही समोर येत आहे. कोर्टावर रेंजर्सनी कब्जा केला आहे, वकिलांना यातना दिल्या जात आहेत, तसंच इम्रान खान यांच्या कारला घेरण्यात आलं आहे, असा आरोप पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी केला आहे.
70 वर्षांच्या इम्रान खान यांना टॉर्चर करण्यात येत आहे, त्यांना मारहाण करण्यात येत आहे. पीटीआयने या अटकेविरोधात देशभरात आंदोलन करावं, असं आवाहन पीटीआयकडून करण्यात येत आहे.
#WATCH पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) ने ट्वीट कर कहा, “पाकिस्तान रेंजर्स ने पीटीआई के अध्यक्ष इमरान खान का अपहरण कर लिया।”
(वीडियो सोर्स: पीटीआई का ट्विटर हैंडल।) pic.twitter.com/qBxWjTupYc
— ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.