कोलकाता: आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ईडन गार्डन्सवर आमनेसामने आले. या सामन्यासाठी ईडन गार्डन्सवर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान या सामन्याच्या निमित्तानं तमाम क्रिकेट चाहत्यांना एकाच वेळी दोन किंग क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाले.
मैदानात क्रिकेटचा किंग
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. सामना जरी कोलकात्यात असला तरी क्रिकेटचा किंग आणि आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचं फॅन फॉलोईंग इथेही फार मोठं आहे. म्हणूनच क्रिकेटच्या किंगला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी ईडन गार्डन्स भरुन गेलं. पण या किंगसोबत आणखी एका ‘किंग’नंही मैदानात हजेरी लावली.
[More]: #Pathaan straight from the Eden Gardens, blessing us with the charm and love.#ShahRukhKhan #IPL2023 #AmiKKR #KKRvsRCB pic.twitter.com/1XArXLIjNH
— Team Shah Rukh Khan Fan Club (@teamsrkfc) April 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.