मुंबई, 22 एप्रिल : शनिवारी जगभरात मुस्लिम समाज रमजान ईदचा सण साजरा करत आहेत. अशातच आज लखनऊ येथे आयपीएल 2023 च्या 30 व्या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्सच्या खेळाडूंनी एकत्र येऊन ईद साजरी केली. गुजरात आणि लखनऊ संघाकडून करण्यात आलेल्या ईदच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे फोटो सध्या नेटकऱ्यांची मन जिंकत आहेत.
शनिवारी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ जाएंट्स या संघांमध्ये आयपीएल 2023 चा 30 वा सामना सुरु आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी ईदचे सेलिब्रेशन केले. यावेळी खेळाडूंनी नवीन कपडे घालून एकमेकांची गळाभेट घेत संपूर्ण जगाला प्रेम आणि बंधुभावाचा संदेश दिला. यानिमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राशिद खान आणि मोहम्मद शमीसह अनेक खेळाडू ईद साजरी करताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.