प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 17 मे : रोजच्या धावपळीच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. काही दुर्दैवी व्यक्तींसाठी मात्र रोजचं जगणं देखील संघर्ष असतो. पुण्यातील 22 वर्षांचा देवेंद्र कोळी हा असाच एक दुर्दैवी व्यक्ती आहे. त्याच्या आयुष्याची गेल्या 22 वर्षांपासून फरफट सुरू आहे.
काय आहे अडथळा?
तुमच्या शहरातून (पुणे)
देवेंद्रची उंची हा त्याच्या प्रगतीमधील मोठा अडथळा आहे. 22 वर्षांच्या देवेंद्रची उंची फक्त 3 फुट आहे. त्याला यामुळे सतत उपेक्षा सहन करावी लागलीय. देवेंद्र लहाणपणापासूनच शुगर जास्त होती. त्यामुळे त्याला अनेक शारीरिक व्याधी जडल्या. तो सातवीमध्ये असताना त्याला शाळेत चक्कर आली. त्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
देवेंद्रच्या उपचारावर दीड लाखांचा खर्च झाला. देवेंद्रचे आई वडील बिगारी कामगार असल्याने त्यांनी पैसे कर्जाने घेतले. आज अनेक वर्ष झाली त्याचे आई वडील हे कर्ज रोज शंभर शंभर रुपये करून फेडत आहेत.
अक्षर असं की मोत्यासारखं, पण आयुष्य झालं खडतर, एका जादूगाराची संघर्ष कहाणी
देवेंद्रला एक इंजेक्शन द्यावे लागते ते ठेवण्यास घरी फ्रीजची आवश्यकता आहे. पण घरात फ्रीज देखील नाही. म्हणून त्याने एक वेगळी शक्कल लढवली त्याने छोट्या मटक्यात पाणी आणि वाळू टाकून ते इंजेक्शन थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात. ऐन तारुण्यात बेरोजगारीचं आणि उपेक्षेचं जगणं देवेंद्र सहन करतोय. वेगवेगळ्या व्याधींशीही त्याला लढावं लागतंय. त्याला सामान्य आयुष्य जगण्यासाठी कोण मदत करणार? हा प्रश्न त्याला सतावतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.