न्यूयॉर्क, 19 मे : जगभरात वातावरण बदलाचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. समुद्राची वाढती पाणी पातळी, उंच इमारतींचे वाढते वजन आणि हवामान बदल या तीन धोक्यांमुळे जगातले सर्वात श्रीमंत शहर न्यूयॉर्क सतत खचत चाललं आहे. यामागचे कारण गगनचुंबी इमारती असून जिओलॉजिस्टनी इशारा दिला आहे. जगाचे तापमान वाढत असून समुद्राच्या पाणीपातळीतही वाढ होतेय. किनारपट्टीवरील शहरांना यामुळे धोका निर्माण होत आहे. जिओलॉजिस्टनी इशारा दिला की, सतत वाढणाऱ्या बांधकामाचे ओझे आणि समुद्राच्या पातळीतील वाढ यामुळे पुराचा धोका वाढत आहे. या सगळ्या कारणांनी शहर बुडण्याचा धोका निर्माण होतो.
भारतातील उत्तराखंडमध्ये जोशीमठ शहरात जमीन खचण्याचे प्रकार घडले आहेत. मोठ्या प्रमाणावर घरांना तडे गेले आहेत. एडव्हान्सिंग अर्थ अँड स्पेस सायन्स नावाच्या मॅगझीनमध्ये एका अभ्यासात संशोधकांनी यावर मत व्यक्त केलं आहे. न्यूयॉर्क शहरात समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ, नैसर्गिक आणि मानवी कारणांमुळे चक्रीवादळांचे वाढते प्रमाण आणि धोका याचा सामना शहर करत आहे. न्यूयॉर्क शहर एक उदाहरण म्हणून घेतलं असून जगभरातील किनारपट्टीवर असलेल्या शहरांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय हे संशोधकांनी दाखवून दिलं आहे.
जगात पहिल्यांदाच 3 लोकांच्या DNA पासून जन्मलं बाळ, सामान्य लोकांपेक्षा त्याच्यात ‘ही’ गोष्ट अगदी खास
रोड आयलँड विद्यापीठातील संशोधकांनी म्हटलं की, न्यूयॉर्क जगभरात असलेल्या किनारपट्टीवरील शहरांचे एक प्रतिक आहे. वेगाने खचणाऱ्या शहरांना पाहता हे एक उदाहरण आहे. याचा अर्थ पुराच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर यातून वाचण्याचं एक जागतिक आव्हान दिसत आहे. न्यूयॉर्क शहरात 80 लाख लोकांचे घर आहे. वर्षाला हे शहर 1 ते 2 मीमीने खचत चालले आहे. काही भागात वेगाने खचण्याची प्रक्रिया सुरू आहे.
न्यूयॉर्क शहर आधीपासूनच पुराच्या धोक्यांसारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. उत्तर अमेरिकेतील अटलांटिक समुद्राच्या पाणी पातळीची वाढ ही जगाच्या सरासरीपेक्षा तीन ते चार पट जास्त आहे. जिओलॉजिस्टनी म्हटलं की, शहराचे लोड प्रोफाइल तयार करण्यासाठी एक लाखांहून अधिक इमारतींचे विश्लेषण करण्यात आले. प्रत्येक इमारतीच्या पायाबद्दल अचूक माहिती मिळवणं कठीण होतं. न्यूयॉर्क शहराने याआधी दोन विध्वंसक अशा वादळांचा सामना केला आहे. यामुळे मोठा पूरही आला होता. २०१२ मध्ये वादळामुळे समुद्राचे पाणी शहरात आले होते तर २०२१ मध्ये चक्री वादळामुळे मुसळधार पाऊस झाल्याने ड्रेनेज सिस्टिम बिघडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.