गणेश गायकवाड, प्रतिनिधी
ठाणे, 3 एप्रिल : ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उंच इमारतीवरून पडलेले सळई कामगाराच्या पाठीत घुसली. या घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ही धक्कादायक घटना घडली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय आहे संपूर्ण घटना –
बदलापुरात ठाणेकर पॅलासीओ या नव्याने तयार होत असलेल्या इमारतीवरून पडलेले लोखंडी सळई थेट कामगाराच्या पाठीत घुसली आहे. या दुर्घटनेत कामगार गंभीर जखमी झाला आहे. सत्यप्रकाश तिवारी असे या कामगाराचे नाव आहे.
शिरगाव परिसरातील ठाणेकर पॅलासिओ या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी सत्यप्रकाश तिवारी हा तरुण सीसीटीव्ही आणि फायर फायटिंगचं काम करत होता. याच वेळी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सळई थेट त्याच्या पाठीत घुसली.
यात सत्यप्रकाश गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर बदलापूरच्या एका खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, याठिकाणी काम करताना कामगारांना ठाणेकर बिल्डरकडून सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवल्याने आणि योग्य ती काळजी न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.