वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 26 मार्च : उद्धव ठाकरे आणि फडणवीस परत एकत्र येण्याची कुठेही चर्चा नाही. बंद खोलीत नाही आणि ओपन गार्डनमध्ये पण नाही. सुतावरून काही परीक्षण केलं जातंय. असे काही चान्स नाहीत. पण राजकारण कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुणे आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
तुमच्या शहरातून (पुणे)
आता आरोप प्रत्यारोप खूप झाले शद्ब वापरून काहीही होत नाही. लोकांना हे आवडत नाही. त्यामुळे आता हे थांबवलं पाहिजे. मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागणे हे काय लगेच हिंदुत्व सोडलं असं नाही. मुस्लिम समाजाला उद्धव ठाकरे यांनी काही आश्वस्त केलं असेल म्हणून मालेगाव मध्ये बोर्ड लागले असतील, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मालेगावच्या सभेवर प्रतिक्रिया दिली.
(‘मस्जिद काढा, मंदिर बांधा, भोंगे उतरवा..’ बच्चू कडू यांचा राज ठाकरेंवर प्रहार)
‘उद्धव ठाकरे आणि फडणवीस परत एकत्र येण्याची कुठेही चर्चा नाही. बंद खोलीत नाही आणि ओपन गार्डन मध्ये पण नाही. सुतावरून काही परीक्षण केलं जातंय. असे काही चान्स नाहीत. पण राजकारण कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
सुप्रीम कोर्ट भाजप मॅनेज करत असा आरोप विरोधक करत आहे. तसंच कसबा निवडून आले की आता ईव्हीएम मशीन फॉल्ट नाही असे आरोप होतो असे अनेक आरोप सध्या विरोधक करत आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.
(मालेगावातील सभेपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का! शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश)
‘राहुल गांधी आणि सावरकर याचा वाद नवीन नाही. ते सारखी टीका करत असतात. मग सावरकरांवर तेच का बोलतात इतर काँग्रेसमधील कुणी बोलताना दिसत नाही, त्यांचा हा व्यक्तीगत विषय आहे, हे पाहावं लागणार आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
‘बावनकुळे खूप प्रवास करतात. बारामतीपर्यंत करतात. मुळात आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी सर्व 48 जागांवर लक्ष देऊन आहोत. अशा फक्त ४ जागा आहेत ज्या कधी जिंकलेल्या नाहीत, अशी कबुलीही पाटील यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.