धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 24 एप्रिल : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढलेला पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरातही मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढलेला पाहायला मिळत आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेमुळे माणसचं नाही तर प्राणीही हैराण झाले आहेत. वाढलेल्या तापमानाचा प्राण्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम पाहायला मिळत आहे. यासाठी राणीची बाग म्हणून मुंबईकरांमध्ये प्रचलित असलेल्या भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानात प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
वाढत्या उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. या उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक छत्र्या तर शीतपेयाचा आधार घेत आहे. या उन्हाचा प्राण्यांनाही फटका बसत आहे. यामुळे प्राण्यांची काळजी घेण्यासाठी मुंबईच्या वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानात खास व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी हरणे, माकडे, हत्तीण, अस्वल, बिबटे, वाघ, तरस, कोल्हे आणि शेकडो प्रकारचे पक्षी आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
वाढत्या उकाड्यात या सर्वांची विशेष काळजी घेतली जात आहे. यामध्ये प्राण्यांना कलिंगड, चिकू, पेरू, थंडगार ऊस, हत्ती-अस्वलासाठी केक, माकडांसाठी गोळा, काकडी, मोसंबी, फणस, हिरव्या भाज्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रत्येक प्राण्याच्या प्रदर्शनीमध्ये पाण्याचे डबके, झरे, छोटी तलाव अशी निर्मिती करण्यात आली आहे.
थंडगार डुबकी ठरतेय आकर्षण
हत्तीणीला उकाड्यापासून संरक्षण मिळण्यासाठी दररोज सकाळी थंड पाण्याची आंघोळ घालण्यात येत आहे. उकाडा वाढल्यास हत्तीण या ठिकाणच्या छोट्या तलावात वारंवार डुबकी मारते. शिवाय बिबट्या, वाघ, तरस, पाणगेंडा, अस्वल आदींसाठी निवासाजवळ छोटे तलाव बनवण्यात आले आहे. उकाडा वाढल्यास हे प्राणी या तलावात बसून थंडगारपणा अनुभवत आहेत.
Good News : वाघांना ‘पेंच’ आवडतंय! व्याघ्र प्रकल्पानं उंचावली महाराष्ट्राची मान, Video
आहार योजनेत बदल
सध्या मुंबईसह अनेक ठिकाणी उन्हाची झळ वाढलेली आहे आणि याचा ज्याप्रमाणे सर्वसामान्य मनुष्याला त्रास होत आहे तसाच प्राण्यांनाही त्रास होत आहे. यामुळे प्राण्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी त्यांच्या आहार योजनेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये कलिंगड, मोसंबी, फणस, यांसारखी हंगामी फळे त्यांना देण्यात येत आहे. यासोबतच बर्फाचे केक देखील दिले जात आहेत. मांसाहारी प्राण्यांसाठी मांसाहारी बर्फाचे केक तयार करून त्यांना दिले जातात. या सोबतच पाण्याच्या फवारे देखील लावण्यात आले आहे. तसेच शेड देखील उभारण्यात आले आहेत. याद्वारे प्राण्यांचा उन्हापासून बचाव करण्यात येत आहे. अश्या प्रकारे प्राण्यांची काळजी घेण्यात येत आहे, असं वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानातील डॉ. अभिषेक साटम सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.