सामान्य पाण्यात भरपूर खनिजे, पोषण आणि हे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील घटकांची कमतरता पूर्ण करते. दूषित पाण्यामुळे हल्ली प्रत्येक घरात आरओ वॉटर फिल्टर्स असतात. मात्र यामुळे पाण्याचे नैसर्गिक खनिजे नष्ट होतात.
अशावेळी शरीरात पाणी शोषण्याची क्षमता देखील कमी होते आणि ते घाम, लघवीच्या रूपात सहजपणे शरीरातून बाहेर पडते. उन्हाळ्यात शरीर वेगाने डिहायड्रेट होते. याबद्दल सुप्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट कविता देवगण यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.
न्यूट्रिशनिस्ट कविता देवगन म्हणतात की, ‘आरओच्या पाण्यामध्ये अनेक नैसर्गिक खनिजे नष्ट होतात. मात्र खनिजांचा अभाव अन्नाद्वारे पूर्ण करू शकता.’ उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे अधिक प्रमाण ठेवण्यासाठी आणि उष्माघात, डिहायड्रेशन टाळण्यासाठी आपण काय करू शकता हे आम्ही येथे सांगत आहोत.
काकडी आणि पुदीना : बाटलीत पाणी भरा आणि त्यात काकडीचे काही तुकडे आणि काही पुदीना टाका. आपण दिवसभर हे प्यायल्यास आपल्याला हायड्रेटेड राहण्यात खूप मदत होते.
लिंबू : आपण उन्हाळ्यात लिंबू देखील वापरणे आवश्यक आहे. मीठाऐवजी पाण्यात लिंबू प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होईल. हे शरीर डिटॉक्सिंग आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यात देखील मदत करते.
पार्सले : एक जग पाण्यात पार्सलेची काही पाने टाकून उकळा आणि थंड झाल्यानंतर बाटलीमध्ये ठेवा. हे पाणी पिण्यासाठी वापरा. हे आपल्याला दिवसभर उर्जा देण्याचे कार्य करेल. आपण त्यात पुदीना पाने देखील टाकू शकता.
बडीशेप आणि ओवा : एका जगमध्ये एक चमचा ओवा आणि एक चमचा बडीशेप टाकून उकळावं आणि थंड झाल्यावर पिण्यासाठी वापरा. हे उन्हाळ्यात उष्माघात आणि पोटाच्या गॅसच्या समस्येपासून आपले संरक्षण करेल.
शिया सीड्स : शिया सीड्स पाण्यात मिसळून खाल्ल्यास ते शरीरास हायड्रेट करण्यात मदत करते आणि यामुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता देखील दूर होते. अशा प्रकारे आपण दररोज सकाळी त्याचा वापर करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.