चेन्नई, 22 एप्रिल : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकला विकेट मिळाली नाही. मात्र नशिबाने साथ दिल्यानं ऋतुराज गायकवाडला त्याने बाद केलं. चेन्नईच्या डावात ११ वे षटक उमरान मलिकने टाकलं. यात अखेरच्या चेंडूवर डेवॉन कॉनवेनं स्ट्रेट शॉट मारला. तेव्हा चेंडू उमरानकडे गेला. पण उमरानला चेंडू पकडता आला नाही आणि हाताला लागून थेट नॉन स्ट्राइकला स्टम्पवर आदळला. हे इतक्या वेगात घडलं की नॉन स्ट्रायकर ऋतुराज गायकवाडला क्रीज सोडून पुढे आल्यानंतर मागे वळण्याचीही संधी मिळाली नाही.
उमरान मलिकच्या हाताला चेंडू लागून तो स्टम्पवर आदळला आणि ऋतुराज धावबाद ठरला. एका बाजूला उमरान मलिकला नशिबाने साथ दिली तर दुसऱ्या बाजूला ऋतुराज कमनशिबी ठरला. तो ३५ धावांवर धावबाद झाला. ऋतुराज अशा पद्धतीने बाद झाल्यानं डेवॉन कॉनव्हेसुद्धा नाराज झाला. त्यानं आपली नाराजीही व्यक्त केली.
RUN-OUT!
Only way this partnership could have been broken 😬
An unfortunate dismissal for Ruturaj Gaikwad who walks back for 35.
Follow the match ▶️ https://t.co/0NT6FhLKg8#TATAIPL | #CSKvSRH pic.twitter.com/dki3CEsVoF
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.