मुंबई, 3 एप्रिल : जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. आज आयपीएल 2023 चा सहावा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून अनेक फोर आणि सिक्स निघत असून यातील एका एका शॉटमुळे टाटा समूहाच्या कारची अवस्था खराब झाली आहे.
चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध लखनऊ यांच्यात सामना सुरु असून तब्बल 4 वर्षांनी चेन्नईचा संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहे. या सामन्यात सुरुवातीला चेन्नईचा संघ होम ग्राउंडवर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे हे दोघे सलामी फलंदाज म्हणून मैदानात आले. मैदानात येताच ऋतुराज गायकवाडने फोर आणि सिक्सची आतिषबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी 25 चेंडूत ऋतुराजने 50 धावा केल्या.
Sponsorship car dented by Ruturaj. #CSKvsLSG pic.twitter.com/CUCIEap2EG
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) April 3, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.