अहमदाबाद, 07 मे : आयपीएलच्या 51 व्या सामन्यात पांड्या बंधू आमने सामने आले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स तर कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली लखनऊचा संघ मैदानात उतरला. कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्याच्या या निर्णयावर गुजरातच्या सलामीच्या जोडीने पाणी फिरवलं. ऋद्धिमान साहा लखनऊच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने तुफान फटकेबाजी करत फक्त 20 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
ऋद्धिमान साहाने पहिल्या षटकात दोन चौकार मारून दणक्यात सुरूवात केली. त्यानतंर पॉवर प्लेमध्ये साहाने २४१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. फक्त 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. षटकार मारत त्याने स्टाइलमध्ये अर्धशतक केलं. त्याने अर्धशतक करताना 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर गुजरातने पॉवर प्लेमध्ये 78 धावा केल्या.
भेट गुरु-शिष्याची! लहानपणीचे प्रशिक्षक भेटताच विराट पडला पाया; पाहा VIDEO
FIFTY for Wriddhiman Saha 🙌🙌
A well made half-century by Saha off just 20 deliveries.
His 12th in IPL.
Live – https://t.co/DEuRiNeIOF #TATAIPL #GTvLSG #IPL2023 pic.twitter.com/RQZ7ZLGlrn
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.