मुंबई, 09 मे: सुमारे 38 वर्षांपूर्वी ‘नसीब अपना अपना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 1986 च्या सुमारास हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी पण चित्रपटाची कथा मात्र सर्वांच्याच मनाला भिडली. या चित्रपटात ऋषी कपूर, फराह नाझ यांच्यासोबत राधिका सरथकुमारचीही मुख्य भूमिका होती. ‘नसीब अपना अपना’ या चित्रपटातून राधिका लाइम लाईट मध्ये आली. तिचा या चित्रपटातील लूक चांगलाच चर्चेत आला होता. राधिका सरथकुमार या चित्रपटातून चांगलीच लोकप्रिय झाली होती.
‘नसीब अपना अपना’ या चित्रपटाने राधिका सरथकुमारचं नशीब बदललं. चित्रपटातील तिचा भन्नाट लूक खूपच लोकप्रिय झाला होता. संपूर्ण चित्रपट राधिकाच्या त्या लूकभोवती लिहिला गेला होता. या चित्रपटात राधिकाने देखील तिची व्यक्तिरेखा खूपच छान साकारली होती. त्यांचे या चित्रपटातील संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील ‘भला है बुरा है जैसा भी है मेरा पती मेरा देवता है’ हे गाणे आजही अनेकदा लोकप्रिय होताना दिसून येतं.
‘नसीब अपना अपना’ चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला चंदूचा लूक नक्कीच आठवेल. या लूकमध्ये तिची ट्विस्टेड पोनीटेल सगळ्यांच्या चांगलीच लक्षात राहिली. यासोबतच चंदूचं बोलणं आणि तिची ड्रेसिंगही स्टाईल खूपच विचित्र होती. मात्र, आता चंदू उर्फ राधिका पूर्णपणे बदलली आहे.
राधिका सरथकुमारला ‘नसीब अपना अपना’ या चित्रपटासाठी लोक ओळखत असतील, पण या चित्रपटाशिवाय तिने इतरही अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘पराया’, ‘अस्ली नक्की’, ‘आज का अर्जुन’, ‘लाल बादशाह’, ‘जीन्स’, ‘रंगा’, ‘मारी’, ‘सिंघम 3’ आणि ‘जेल’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. राधिकाने बॉलिवूडसोबतच साऊथ इंडस्ट्रीमध्येही खूप नाव कमावलं.
राधिकाने 4 फेब्रुवारी 2001 रोजी अभिनेता सरथकुमारसोबत लग्न केले. राधिका मुलगी रायन हार्डी आणि मुलगा राहुल सरथकुमार यांची आई आहे. यासोबतच ६९ वर्षांची राधिका आज आजी देखील झाली आहे. तिच्या मुलीचे लग्न क्रिकेटर अभिमन्यू मिथुनशी झाले आहे. 2014 मध्ये राधिका खूपच चर्चेत आली होती. याचं कारण तिच्यावर घोटाळा केल्याचा आरोप होता. तिच्या मॅजिक फ्रेम्स कंपनीने रेडियंस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून काही पैसे घेतले होते. जो तिने चेकद्वारे परत केला. 2017 मध्ये दिलेले चेक बाऊन्स झाले होते. त्यानंतर तिच्यावर करोडोंचे कर्ज घेतल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने राधिकाला तिच्या पतीसह एक वर्षाची शिक्षा सुनावली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.