चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 21 एप्रिल : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही अद्याप चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. अजित पवार हे जितके स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध तितकेच मिश्कील बोलण्यातही वाकबगार आहेत. याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. पुण्यातील दौऱ्यात एका कार्यकर्त्याने चक्क जावा बाईक अजित पवार यांना दाखवण्यासाठी आणली होती. यावेळी अजित पवार यांच्या मिश्कील प्रश्नावर कार्यकर्त्यांमध्ये खसखस पिकलेली पाहायला मिळाली.
Video: अजित पवार यांनी घेतली कार्यकर्त्याची फिरकी
#ajitpawar #pune pic.twitter.com/bPNQYrN8dq
— News18Lokmat (@News18lokmat) April 21, 2023
तुमच्या शहरातून (पुणे)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.