मुंबई, 10 एप्रिल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे पुन्हा एकदा मुंबईमध्ये येत आहे. 16 एप्रिलला दे मुंबईत असणार आहे.
अमित शहा पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहे. पुढील रविवारी 16 एप्रिल रोजी मुंबईत येणार आहे. महारष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अमित शहा हे मुंबईत येत आहे.
(उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाकडून पक्षनिधीवर दावा)
मागील तीन महिन्यात अमित शहा हे अनेक वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 19 फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये आले होते. त्याआधी नागपूरमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. पुणे पोटनिवडणुकीच्या दरम्यानही अमित शहा यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती.
(…तेव्हा आम्हाला मतदाराने अक्षरशः हाकलून लावले; खडसेंनी सांगितला भाजपमध्ये असतानाचा ‘तो’ किस्सा)
विशेष म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार याकडे सगळेच पक्ष लक्ष ठेवून आहे. पण अद्यापही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे अमित शहा यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.