गणेश दुडम, प्रतिनिधी
पुणे, 18 एप्रिल : देहूत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कीर्तनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं देहूतील त्रैमासिक कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षण समारोप सोहळा. या सोहळ्याला शरद पवार यांनी उपस्थिती लावली. शरद पवार यांनी कीर्तन सुरू होताच एकाग्रतेने ऐकत ते तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शरद पवार यांच्यावर कीर्तनकार उल्हास पाटील यांनी स्तुतीसुमने उधळत पवारांवर अभंग सादर केला. शरद पवार हे शेतकऱ्यांचे पांडुरंग असे सांगत त्यांनी पवारांचे कौतुक केले. शरद पवारांनी देखील ह्या अभंगाला दाद दिली आहे. यावेळी शरद पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं.
काय म्हणाले शरद पवार?
तुमच्या शहरातून (पुणे)
मला पुढं एका कार्यक्रमाला साडेसात वाजता पोहचायचे आहे, त्यामुळं वेळे अभावी मी मध्येच बोलायला उभं राहतोय. देवधर्म, पूजाअर्चा या नावाखाली काही वर्गाची फसवणूक होत आहे. फसवणूक करणाऱ्या वर्गाचा मुखवटा समोर आणायला हवा. संतांनी जी शिकवण दिली आहे, ते सामान्य लोकांसमोर मांडायला हवी. त्यामुळं समाजातील कटुता कमी होईल. आज पूजा कोणाची करायची याबाबत आपण चर्चा करतो? तुकोबांनी सांगितलं आहे की तुम्ही आजूबाजूला असणाऱ्या उपेक्षितांची पूजा अर्चा करा, तेंव्हाच तुम्हाला सिद्धी मिळेल। खरा कष्टकरी, सामान्य माणसाला योग्य तो सन्मान द्यायला हवा. हीच शिकवण समाजाला द्यायला हवी.
Video : देहूत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कीर्तनात तल्लीन..#sharadpawar #pune pic.twitter.com/uaP9d1yJrX
— News18Lokmat (@News18lokmat) April 18, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.