अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी
कानपूर, 15 मे : गाडीची चावी हरवली तर आपण सगळीकडे शोधाशोध घेतो, किंवा जर चावी सापडलीच नाहीतर बनावट चावी तयार करून घेतो. पण, चावी सापडत नाही म्हणून एका नशेबाज तरुणाने आपल्याच दुचाकीला आग लावून टाकली. या घटनेमुळे रस्त्यावर एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील कैंट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संजयनगर येथील कळवा पूलाजवळ ही घटना घडली आहे. त्याचं झालं असं की, एक तर्राट झालेला तरूण पुलावर येऊन थांबला होता. तो बराच वेळ काही तरी शोधत होता. लोकांनी जेव्हा त्यांच्याकडे विचारणा केली असता गाडीची चावी हरवली असल्याचं सांगितलं.
आधीच दारू ढोसलेली असल्यामुळे त्याला पुढे काही दिसत नव्हतं. त्यामुळे तो पुरता गोंधळून गेला होता. बराच वेळ इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर त्याचा पारा चढला आणि रागाच्या भरात दुचाकी पेटवून दिली. अचानक झालेल्या घटनेमुळे पुलावरच एक खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाली.
(1 वर्षाची काजल आईच्या कुशीत झोपली होती अन् तितक्यात पलंगावर चढला विषारी साप, पुढे घडलं भयंकर!)
अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. ‘ स्थानिक लोकांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण कानपूरमधला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.