मुंबई, 7 मे : आयपीएल 2023 मध्ये 52 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा पराभव केला. सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सनवर 4 विकेट्सने विजय मिळवला
जयपूर येथील राजस्थान रॉयल्सच्या होम ग्राउंडवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांची जोडी मैदानात उतरली. जोस बटलरने केवळ 59 चेंडूवर 95 धावा केल्या. तर संजू सॅमसनने देखील यशस्वी जयस्वालनंतर संघाचा डाव सावरताना 38 चेंडूत 66 धावा केल्या. याशिवाय राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 35 धावा केलया. राजस्थान रॉयल्सने २० ओव्हरमध्ये केवळ 2 विकेट्स देऊन 214 धावांची कामगिरी केली.
विजयासाठी २१५ धावांचे आव्हान मिळाल्यावर सनराइजर्स हैदराबादकडून अनमोल प्रीत सिंह आणि अभिषेक शर्मा यांची जोडी मैदानात उतरली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.