गोविंद वाकडे, प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड, 15 मे : लोक दारू पिण्यासाठी काहीही करतात हे तुम्ही कधीतरी वाचलं असेल. मात्र, पिपरीं चिचवड शहरात घडलेल्या एका प्रकाराने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. एका दारुड्याने केलेल्या प्रकाराने पोलिसांनीही डोक्याला हात लावला. हा प्रकार पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घडला आहे.
काय आहे प्रकरण?
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात बॉम्ब असल्याचा फोन आल्याने पोलिसांची मोठी धावपळ झाली. घटनास्थळी अग्निशमन बंबापासून सर्व यंत्रणा आल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीचा फोन बंद आला. तपास केल्यानंतर पोलिसांनी डोक्यालाच हात लावला. कारण फोन करणारा व्यक्ती हा दारुड्या असल्याचं तपासात समोर आलं. आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. परवा रात्री हा प्रकार घडला. रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत शहरातील यंत्रणा धावपळ करत होत्या. दरम्यान पोलीस त्या तरुणांपर्यंत पोहचले. मंगेश पिंगळे नामक तरुणाकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मंगेश डोक्यावर पडल्याने जखमी झाला होता. त्याला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, दारू पिण्यासाठी त्याला बाहेर जायचं होते. पण रुग्णालय स्टाफ त्याला बाहेर जाऊ देत नसल्याने त्याने हा उद्योग केल्याचं समोर आलं. या घटनेनंतर पोलिसांनी डोक्याला हात मरून घेतला.
..तर किशोर आवारे खूनाच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीचे आ. शेळकेंना होणार अटक
तळेगाव दाभाडे (ता. मावळ,जि. पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची चार हल्लेखोरांनी काल (12 मे) भरदिवसा नगरपरिषद कार्यालयासमोरच निर्घूण हत्या केली. या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा – लेकीने रडणाऱ्या बाळाला शांत केलं अन् आजी-आजोबांना झाली अटक; नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, हे आरोप आमदार सुनील शेळके यांनी फेटाळलेत. काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही शेळके यांनी म्हटलं आहे. यात राजकारण करून आपल्याला गोवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मावळच्या तळेगावात किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनं तळेगावात खळबळ उडाली. या प्रकरणी चार मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.