गणेश दुडम, प्रतिनिधी
मावळ, 12 मे : पुण्यातील मावळमध्ये भर दिवसा मुळशी पॅटर्नचा थरारक घटना पाहण्यास मिळाली. मावळमधील तळेगावमध्ये जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. चेहऱ्यावरच कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपरिषद कार्यालासमोरच ही धक्कादायक घटना घडलेली आहे. जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे हे नगरपरिषदेच्या कार्यालयातून बाहेर आले. त्यावेळी तिथेच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले. घटनास्थळावर गोळीबार ही झाल्याचं बोललं जातंय.
तुमच्या शहरातून (पुणे)
#पुणे : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची हत्या pic.twitter.com/cPsNSgN0jR
— News18Lokmat (@News18lokmat) May 12, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.