सिलीगुडी : मुलाला अंगाखांद्यावर खेळवायची खूप स्वप्न पाहिली पण ती 7 दिवसात भंग होतील याची कल्पना त्याच्या वडिलांना नव्हती. आजारी असलेल्या 5 महिन्यांच्या मुलासाठी रक्ताची पाणी करून 16 हजार रुपये उभे केले. उपचार सुरू झाले. सुरुवातीला बरं वाटतं असं वाटत असताना 6 दिवसांच्या उपचारानंतर चिमुकल्याने जगाचा निरोप घेतला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला.
वडिलांच्या खिशात चिमुकल्याचा मृतदेह घरापर्यंत घेऊन जाण्याएवढे पैसेही शिल्लक नव्हते. त्यांनी रुग्णालयातील रुग्णावाहिका देण्यासाठी खूप विनवणी केली. मात्र त्यांनी 8 हजार रुपये भरा आणि रुग्णवाहिका घेऊन जा असं सांगितलं. हताश झालेल्या वडिलांनी 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह अखेर पिशवीत भरला आणि 200 किलोमीटर प्रवास केला.
मध्यरात्री अल्पवयीन मुलीसोबत रस्त्यावर धक्कादायक घटना, अमरावतीत खळबळ
वडिलांनी मुलाचा मृतदेह पिशवीत भरून बसमधून प्रवास केला. कलियागंज इथे पोहोचेपर्यंत कुठल्याही प्रवाशाला या गोष्टीही जराही कुणकुण त्यांनी लागू दिली नाही. या व्यक्तीचं नाव आशिम देबशर्मा असल्याची माहिती मिळाली आहे. प्रवाशांना जर समजलं तर ते बसमधून उतरवतील आणि घरी जाऊ शकणार नाही याची भीती त्याला होती. त्यामुळे मूक गिळून त्याने हे धक्कादायक कृत्य केलं.
चार दिवसांत रोखले तब्बल 5 बालविवाह, नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई
ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. भाजप पक्षाने टीएमसीच्या नेत्यांना ट्विट करून प्रश्न विचारले. तसंच सरकारवरही टीका केली. या मुद्द्यावरून TMC आणि भाजप यांच्यात आता वाद सुरू झाला आहे. या वादामध्ये सामान्य जनता मात्र भरडली जात असल्याचं ट्विटरवर अनेक युजर्सनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.