मुंबई, 06 मे : ऐश्वर्या राय पुन्हा एकदा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटात नंदिनीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. ती ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये नंदिनी म्हणूनही लोकप्रिय झाली, ज्यामध्ये सलमान खानसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. याच चित्रपटावेळी दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नंतर त्यांच्यात खूप काही घडले. ऐश्वर्या रायने एकदा सलमान खानवर घरगुती हिंसाचार, फसवणूक आणि अपमान यांसारखे गंभीर आरोप केले होते. ऐश्वर्याच्या या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सलमान खान तिचं नाव न घेता इतकं काही बोलला होता की त्याचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले होते.
सलमान खान हा बॉलीवूडमधील सर्वात प्रिय स्टार्सपैकी एक आहे, ज्याचे स्टारडम इतके आहे की ‘किसी का भाई किसी की जान’ सारखे फ्लॉप कथा असलेले त्याचे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात. सलमान त्याच्या स्पष्टवक्ते शैली आणि विधानांसाठी ओळखला जातो. चित्रपटांव्यतिरिक्त तो त्याच्या प्रेमसंबंधांमुळे अनेकदा चर्चेत असतो. पण आजवर ऐश्वर्या रायसोबतच्या नात्यामुळे तो सर्वाधिक चर्चेत आला आहे.
सलमान आणि ऐश्वर्या एकेकाळी एकमेकांवर खूप प्रेम करत होते, पण त्यांच्या या लव्हस्टोरीचा शेवट खूप वाईट झाला. ऐश्वर्या रायने त्याच्यावर तिला मारहाण केल्याचा आरोप केला होता. ज्याच्या प्रत्युत्तरात सलमान खानने तिला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. ज्याची आजही चर्चा होते. जेव्हा एनडीटीव्हीने मुलाखतीदरम्यान सलमान खानला विचारले होते की, त्याने कधी कोणत्याही महिलेवर हात उचलला आहे का? त्यावर सलमान खान कोणाचेही नाव न घेता म्हणाला, ‘आधीच एका महिलेने मी हे केले आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे आता मला त्यात पडायचे नाही.’
सलमान खान पुढे म्हणाला होता कि, ‘काही वर्षांपूर्वी एका पत्रकाराने मला हा प्रश्न विचारला होता, तेव्हा मी टेबलावर हात मारला आणि ते घाबरले त्यानंतर ते टेबल तुटून गेलं. मला म्हणायचे आहे की, मी कोणाला मारले तर भांडण होईल, मला राग येईल. मी तिला अजून जोरात मारले असते तर ती त्यातून वाचली असती असे वाटत नाही. त्यामुळे ते खरे नाही. हे कोणत्या कारणास्तव बोलले ते मला माहीत नाही.’
2002 मध्ये बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या राय बच्चनने सलमान खानवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. अभिनेत्री म्हणाली होती, ‘तो नशेत असताना वाईट वागायचा, जे मी त्याच्यासोबत राहताना सहन केले आणि त्या बदल्यात मला शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक पातळीवर हिंसाचार सहन करावा लागला. मला प्रेमाच्या बदल्यात फक्त फसवणूक आणि अपमान मिळाला. म्हणून, इतर कोणत्याही स्त्रीप्रमाणे, मी माझ्या स्वाभिमानासाठी त्याच्याशी संबंध तोडले’ तिच्या या खुलाश्यानंतर सगळीकडे खळबळ निर्माण झाली होती.
‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि ऐश्वर्यामध्ये जवळीक वाढली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि 2002 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. कामाबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान पुढे ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. ऐश्वर्या राय सध्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे, ज्यातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.