रवी पाईक (राजस्थान), 28 एप्रिल : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन आणि इंटरनेटचा बोलबाला सुरू आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक खेळांपासून दूर राहून लहान मुले आणि तरुण मोबाइल आणि लॅपटॉपमधील ऑनलाइन गेमिंगमध्ये आपली आवड दाखवत आहेत. पूर्वी मुले मैदानात क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, खेळताना दिसायची. पण आता इंटरनेटच्या जमान्यात मुलं ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त आहेत. याचा वाईट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ऑनलाइन गेम्समुळे जुने खेळ जवळपास नामशेष झाल्याचे दिसत आहे. यावर तज्ञांनी सल्ला दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालक जेव्हा कामात व्यस्त असतात तेव्हा आपल्या मुलांना मोबाईल फोन देतात. याचा वाईट परिणाम मुलांवर होतो. यातून मुलांची चिडचिड वाढते याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि शारिरीकरचनेवर होतो.
कमरेपासून जोडल्या गेल्यात या जुळ्या बहिणी; एक सिंगल, तर एक रिलेशनशिपमध्ये, रोमान्स करतानाही…
भिलवाडा येथील उपमुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम चावला म्हणाले की, ज्याप्रकारे ऑनलाइन गेमचा ट्रेंड वाढत आहे, त्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो. एवढेच नाही तर मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे मानसिकता, विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता आणि बघण्याच्या क्षमतेवरही मोठा परिणाम होत आहे.
मोबाईल पाहणे आणि जास्त वेळ गेम खेळणे याचाही मुलांच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत मुलांनी मोबाईलचे व्यसन सोडून घराबाहेर पडून खेळण्याची गरज आहे. आपल्या कामात व्यस्त असल्याने पालक मुलांच्या हातात मोबाईल सोपवतात. यामुळे लहान मुलं कित्येक तास मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. पण याचा मुलांच्या आयुष्यावर खूप दुष्परिणाम होताना दिसत आहे.
भारताच्या गेमिंग इंडस्ट्रीमध्ये मुलांवर आणि तरुणांवर आपली जादू कायम ठेवली आहे. यापैकी, PubG, फ्री फायर, कँडी क्रश, टेम्पल रन, लुडो किंगसह इतर अनेक गेम आहेत ज्याचा लोकांनी आपल्या दिनक्रमात समावेश केला आहे. कँडी क्रश आणि लुडो हे असे ऑनलाइन गेम आहेत जे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या जवळपास सर्व लोकांच्या मोबाईलमध्ये आढळतात. केवळ लहान मुलेच नाही तर तरुणांनाही मोकळ्या वेळेत हे खेळ खेळायला आवडत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सध्या यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची माहिती देण्यात आली.
बायको हवी पण मेहुणा नको! लग्नासाठी भाऊ नसलेली वधू शोधत आहेत तरुण, कारण…
डॉ.घनश्याम चावला यांनी न्यूज 18 च्या माध्यमातून सांगितले की, लहान मुले आणि तरुणांना ऑनलाइन गेमपासून दूर ठेवण्यासाठी लहान मुलांच्या हातात कमीतकमी मोबाईल द्यायला हवा याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. याचबरोबर तुमचे अपत्य मोबाईलवर काय खेळतं आणि काय पाहतंय याकडेही लक्ष द्या. मोबाइलमध्ये सिक्युरिटी पासवर्ड ठेवा जेणेकरून मोबाइल सेफ्टी मोडमध्ये राहू शकेल. असेही त्यांनी आवाहन केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.