मुंबई, ता.१६
येत्या 25 फेब्रुवारी, 2022 रोजी मुंबई येथे महाराष्ट्रामधील ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लढणारे संघटन म्हणून नविन संघटनेची घोषणा करण्यात येणार आहे.
ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या अनेक प्रश्नांवरती गेल्या दोन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने मोर्चे घेण्यात आले. महाराष्ट्र भरातील सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा ओबीसींचे सामाजिक संघटन असावे, असा आग्रह होत आहे. त्यासंदर्भात येत्या 25 फेब्रुवारी, 2022 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहामध्ये महाराष्ट्रामधील प्रमुख नेते / कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे. त्या दिवशी महाराष्ट्रामधील ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लढणारे संघटन म्हणून नविन संघटनेची घोषणा करण्यात येणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि व्हीजेएनटी या बहुसंख्येने असणाऱ्या समुहाला आपले संविधानीक हक्क व अधिकार, शिक्षण नोकऱ्या आणि पंचायत राजमधील आरक्षण या संदर्भात घटनात्मक हक्काविषयी जागृत करणे हे महत्वाचे उद्दिष्ट या संघटनेचे असणार आहे.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर ओबीसींना एकत्र करुन जात निहाय जनगणना व पंचायत राज मधील 27% आरक्षणासंदर्भात केंद्र शासनाला घटना दुरुस्ती करुन राजकीय आरक्षण मिळविणे ही उद्दिष्टे राहणार आहेत.
ओबीसी हा विस्तृत असा विखुरलेला समाज आहे. गेल्या 70 वर्षामध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांच्या ज्या भुमिका घेवून अनेक संघटना काम करत आहेत. ती गेली 25 वर्षे सार्वजनिक जिवनामध्ये काम करत असताना मी आता ओबीसी मंत्री म्हणून जो अनुभव आलेला आहे. ओबीसींना व युवकांना धार्मिक आणि जातीच विषारी भावनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असतांना आम्ही स्वस्थ राहून पहात बसने शक्य नाही. म्हणून युवक-युवती- प्राधान्य अभ्यासक विचावंत कलाकार यांना एकत्र करुन हे नव संघटन उभा करत आहे.
ओबीसी व्हिजेएनटी च्या सामाजिक न्यायहक्कासाठी संघटीत प्रयत्न करणार,
सामाजिक संघटना उभारणार,
गेल्या दोन वर्षात अनेक आंदोलने, मोर्चे,
महाराष्ट्रातून सर्व पक्षीय ओबीसी कार्यकर्त्यांची संघटनात्मक प्रयत्न करण्याची मागणी,
ओबीसीच्या अनेक प्रश्नावर अक्रमकपणे काम करत आहोत.
- संवर्गनिहाय प्राध्यापक भरती कायदा
- पंचायतराज ओबीसी आरक्षण बील
- महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत.