मुंबई, 09 मे : सामान्यपणे औषधांच्या गोळ्या खाऊन झाल्या, पाकिटातील गोळ्या संपल्या की आपण ही रिकामी पाकिटं फेकून देतो. पण तुम्हाला माहिती आहे का? औषधांच्या गोळ्यांची रिकामी पाकिटंही खूप फायद्याची आहे. या पाकिटांचाही तुम्ही एक ना दोन तर किती तरी पद्धतीने वापर करू शकता. तुम्ही विचारही केला नसेल, पण यामुळे तुमच्या पैशांचीही बचत होईल.
तुमची आजी, आई, अशा बऱ्याच गृहिणी ज्यांच्याकडे छोट्या छोट्या आयडिया असतात. घर चालवताना त्या काही ना काही जबरदस्त उपयोगी असा जुगाड करतात. अशाच जुगाडापैकी औषधांच्या रिकाम्या पाकिटाचा हा एक जुगाड आहे. एका गृहिणीने सोशल मीडियावर हा जुगाड सांगितला आहे. तिने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या गृहिणीने औषधांच्या पाकिटाचा काय आणि कसा करायचा हे या व्हिडीओत सांगितलं आहे. त्यासाठी हा व्हिडीओ पाहा.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. महिला सुरुवातीला काही किचन टिप्स सांगते आणि व्हिडीओच्या मध्यात ती औषधांच्या गोळ्यांच्या रिकाम्या पाकिटाचा वापर दाखवते.
महिलेने व्हिडीओत सांगितल्यानुसार तुम्ही या पाकिटांनी किचनमधील असलेला गॅस स्वच्छ करू शकता. गॅसवरील बटणं, बर्नरच्या कडेचा भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पाकिटांच्या कडांचा वापर करू शकता. किचनवरील कोपरे स्वच्छ करू शकता. अशी बरीच भांडी असतात, ज्यातील काही भाग स्वच्छ करता येत नाही. असे भाग तुम्ही या पाकिटांच्या कडांनी स्वच्छ करू शकता.
कात्री, नेलकटरने तुम्ही ही पाकिटं कापून कात्री, नेलकटरला धार आणू शकता. मिक्सरचं भांड्याचं ब्लेड, भाज्या कापण्याचा चॉपर यांची धार कमी होते. यावेळी आपण त्यांचं ब्लेड बदलून घेतो, ज्यासाठी आपले पैसेही खर्च होतात. पण तुम्ही याऐवजी औषधांची रिकामी पाकिटं कापून टाकून त्यात फिरवून घ्या. ज्यामुळे त्याला धार येईल आणि तुमच्या पैशांची बचतही होईल.
हे उपाय प्रभावी ठरतीलच याची शाश्वती न्यूज 18 लोकमत देत नाही. तुम्ही हे उपाय करून पाहा आणि ते किती कामाचे आहेत, हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.