अहमदनगर, ता.१६
कर्जत जामखेड मतदारसंघातील मतेवाडीमध्ये रस्ता आणि तलाठी कार्यालयाचं भूमिपूजन, नान्नजमध्ये श्रीराम मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण आणि रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन रोहित पवार यांनी केले. यावेळी राहुल साळवे यांच्या राहुल मेडीकललाही त्यांनी सदिच्छा भेट दिली. संजय नवले आणि विनोद शंकर नवले यांनी जामखेडमध्ये ‘नवले पेट्रोलियम’मध्ये सीएनजी पंप सुरु केला असून त्याचं उद्घाटन करुन त्यांनाही शुभेच्छा दिल्या. जामखेड तालुक्यात प्रथमच सीएनजी पंप होत असल्याचा आनंद वाटतो असे पवार यावेळी म्हणाले. लवकरच कर्जतमध्येही अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
मतदारसंघातील गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठीच्या कामांनी चांगलाच वेग घेतला आहे. काल जामखेडमध्ये बैठक घेऊन या कामांचा आढावा घेतला. तसंच जामखेडमध्ये ‘समृद्ध गाव संकल्प योजने’ची बैठक घेऊन या योजनेत मागील वर्षी सहभागी झालेल्या ४० गावांमध्ये झालेल्या कामाचा आढावा घेतला. गावाच्या विकासासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने पुढील वर्षी या योजनेत सहभागी होणाऱ्या गावांची संख्या अधिक वाढेल, असा विश्वास आहे. या बैठकीला बीडीओ पोळ साहेब यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि कृषि सहाय्यक उपस्थित होते.
माझ्या मतदारसंघात ‘एमआयडीसी’ झाल्यानंतर इथल्याच युवांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील येथील आयटीआय चं सक्षमीकरण करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने काल जामखेडच्या आयटीआय मध्ये Piaggio कंपनीने विद्यार्थ्यांना BS6 इंजिन दिलं. तसंच पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी फिल्टर बसवला. या दोन्हीचंही उद्घाटन केलं.
‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न जागीच मार्गी लावता येतात. त्यामुळं मतदारसंघात हा उपक्रम नियमित घेण्यात येतो. काल जामखेडमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमात नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
संतोष आणि संदिप या पिसाळ बंधूंनी जामखेडमध्ये ‘मे. श्रीराम ट्रेडिंग कंपनी’ हे आडत दुकान सुरु केलंय, त्याचं उद्घाटन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, रत्नापूर येथील ‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर’ या संस्थेमार्फत नर्सिंग, फार्मसी व होमिओपॅथिक महाविद्यालयासाठी दोन बस आणि रुग्णवाहिका देण्यात आली. त्यांचं लोकार्पण केलं. जामखेडमध्ये प्रविण उगले यांनी Sensu Lights हे LED लाईट्स तयार करणारं युनिट सुरु केलंय. त्याचं उद्घाटन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’च्यावतीने आणि पुण्यातील एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या सहकार्याने कर्जतपाठोपाठ आता जामखेडमध्येही केवळ ३० ₹ एवढ्या माफक दरात नेत्र तपासणी केंद्र सुरु करण्यात आलं. या केंद्राचंही उद्घाटन केलं. जामखेड तालुक्यातील रुग्णांना या केंद्राचा मोठा फायदा होईल.