दिल्ली, 19 एप्रिल : मणिपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. मणिपूरमध्ये एन बीरेन सिंग सरकारविरोधात भाजप आमदार नाराज झाले आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार आमदारांचं शिष्टमंडळ वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये तळ ठोकून आहे. या शिष्टमंडळामध्ये तब्बल 40 आमदारांचा समावेश आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार नाराज असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. मात्र वरिष्ठांशी बोलणं म्हणजे शिस्तभंग नाही असं या आमदारांनी म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार सरकारमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
कर्नाटकमध्ये भाजपला धक्का
दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे, भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी तीन दिवसांपूर्वी विधानसभा सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तिकीट न मिळाल्यानं त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जगदीश शेट्टर यांनी बंडखोरी केल्यानं याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसणार का हे पहावं लागणार आहे. जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपची प्रतिक्रिया
दरम्यान माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पक्ष आणि आमदारकीचा राजीनाम देऊन, पक्षाच्या हितापेक्षा त्यांनी स्वतःला निवडल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.