चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 13 मे : नकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. कर्नाटकात 40 टक्के कमिशनचा मुद्दा प्रचारात खूप गाजला होता. या निकालानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील याच विषयावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील मंत्री सुद्धा काम करायला 20 टक्के कमिशन घेतात. सगळ्या मंत्र्यांचे पीएस हे कोट्यवधी रुपये घेउन काम करतात, असा आरोप खासदार जलील यांनी केला आहे. ते पुण्यात आले असता त्यांना माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार इम्तियाज जलील यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
तुमच्या शहरातून (पुणे)
जलील म्हणाले, तुम्ही कुठल्याही मंत्र्यांच्या पीएकडे काम घेऊन जा आणि सांगा की मी तुम्हाला 20 टक्के देतो, लगेच काम होईल. खासदर म्हणून मी खूप जबाबदारीने हे वक्तव्य करत आहे. तुमचं काम लगेच होईल. मोदींच्या केरला स्टोरीला मतदारांनी कर्नाटक स्टोरीने चपराक दिली असल्याची टीकाही यावेळी जलील यांनी केली.
कर्नाटक निकाल हे नरेंद्र मोदींचे अपयश : इम्तियाज जलील
मी त्यांना केरला स्टोरीजचे तिकीट स्पॉन्सर करतो. त्यांनी थिएटरमध्ये जाऊन पॉपकॉर्न खावे. देशात लोकशाही जिवंत आहे हे निकालातून दिसते. हा निकाल टर्निंग पॉइंट ठरणार आहे. भाजपचे अच्छे दीन संपुष्टात आले असल्याचा दावा जलील यांनी केला. पुढे ते म्हणाले, कर्नाटकमध्ये आमची फारशी ताकद नाही. म्हणून आम्ही तिथे उमेदवार उभे केले नाही. आम्ही फक्त दोन जागा लढलो. मी कुठल्याही स्वरूपाच्या स्मारकाच्या विरोधात आहे. लोकांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा देणे हेच स्मारक होऊ शकते. आम्ही गोपीनाथ मुंडेंच्या नावाने 200 बेडचे हॉस्पिटल उभे केले. तेच खरे स्मारक. उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री औरंगाबादमध्ये येणार असतील तर मी त्या कार्यक्रमाला जातो. तिथे विरोध स्वीकारून माझा मुद्दा मांडत असतो, असंही ते म्हणाले.
वाचा – ‘ही चांगली गोष्ट आहे की..’ कर्नाटक विधानसभा निकालावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भ्रष्टाचार : जलील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा पाटण येथे आयोजित केलेल्या शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर कर्नाटक निवडणुकीच्या निकालाबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी शरद पवार यांच्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा येईल या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला. तसे कर्नाटकात 40 टक्के कमिशन द्यावे लागते. तसाच भ्रष्टाचार महाराष्ट्रातही आहे. इथे कुठलेही काम करून घ्यायचं असेल तर मंत्र्याला 15 ते 20 टक्के द्यावे लागतात. मंत्रालयात गेलो आणि मंत्र्याच्या पीएला भेटून पंधरा टक्के देतो असं सांगितलं की तुमचं काम झालं समजा, असा गंभीर आरोप जलील यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.