मुंबई, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं असून काँग्रेसला एकहाती सत्ता मिळताना दिसत आहे. काँग्रेस 137 जागांच्यावरती आघाडीवर दिसत आहे. तर, भाजप 65 जागांच्या आसपास अडकली आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात हालचालींना वेग आला आहे. मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत कर्नाटक निकालावर चर्चा झाली. या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्नाटक विधानसभा निवणुकानंतर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक
कर्नाटक विधानसभा निकालानंतर मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत कर्नाटक निकालावर चर्चा झाली. यावेळेस कर्नाटकने भाजपला हद्दपार केलं. आता महाराष्ट्रातूनही भाजपला हद्दपार करू, असं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केलं. ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये काँग्रेसने जनतेपर्यंत भाजपचा खरा चेहरा पोहोचवला. राज्यात देशात असलेली महागाई आणि धार्मिक तेढ हे अनेक विषय सतत चर्चेत ठेवून भाजप लोकांची दिशाभूल करत आहे. याला कर्नाटकच्या जनतेने अचूक उत्तर दिले आहे. याच पद्धतीने आपणही राज्यातील सर्व जनतेला भाजप सरकार कसं असक्षम आहे हे पोचवलं पाहिजे. या बैठकीला राज्यभरातील आमदार जिल्हाप्रमुख आणि पक्षाचे नेते मंडळी उपस्थित होते.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. कर्नाटकच्या जनतेने शहाणपणाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांचे अभिनंदन,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाहंच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
वाचा – Karnataka Election : कर्नाटक विधानसभेचा निकाल म्हणजे..; उद्धव ठाकरेंचा थेट मोदी-शाहंवर हल्ला
‘कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. 2024 सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन,’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यातील मोठे नेते भाजपाने कर्नाटकात प्रचारासाठी उतरवले होते. पंतप्रधान मोदी यांनी सलग दोन दिवस रोड शो केला होता. तरीही कर्नाटकात भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.