विजयपूर, 10 मे : कर्नाटक निवडणुकीसाठीचं मतदान आज पार पडलं आहे, पण या निवडणुकीला गालबोट लागलं आहे. कर्नाटकच्या विजयपूरमध्ये ईव्हीएम मशीनचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी हंगामा केला आहे. संतापलेल्या ग्रामस्थांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन फोडलं आहे. कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी मतदारसंघातील मसाबिनाला गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडीत अतिरिक्त ईव्हीएम मशीन असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचा चुराडा केला आहे. हे ग्रामस्थ निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांच्या अंगावर धावून गेले, निवडणूक कर्मचाऱ्यांची गाडीही फोडली. या प्रकरणी विजयपूर पोलिसांनी 20 ते 25 जणांना ताब्यात घेतलं आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विजयकुमार दानम्मनवरनी यांनी दिले आहेत.
कर्नाटक विधानसभा मतदानावेळी तुफान राडा, ग्रामस्थांनी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट फोडलं#KarnatakaElections pic.twitter.com/URAIHtISOy
— News18Lokmat (@News18lokmat) May 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.